Horoscope 10 May 2022 : प्रेमप्रकरणात विभक्त होण्याची परिस्थिती, योगा आणि व्यायामात वेळ घालवा

आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

Horoscope 10 May 2022 : प्रेमप्रकरणात विभक्त होण्याची परिस्थिती, योगा आणि व्यायामात वेळ घालवा
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 5:00 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मेष –

यावेळी ग्रह गोचर आणि भाग्य दोन्ही तुमच्यासाठी अनुकूल आहेत. पण, याचा सदुपयोग करणं तुमच्या कार्य क्षमतेवर निर्भर करतं. मालमत्तेशी संबंधित विषयावर कुटूंबातील सदस्यांशी महत्वापूर्ण चर्चा होईल. त्यातून योग्य निर्णय देखील निघेल.
व्यर्थ कामात वेळ वाया घालवू नका. मनात अशांतता आणि तणावाचे वातावरण राहिल. काहीवेळ निसर्गाच्या सानिंध्यात घालवा आणि ध्यान धारणेवर लक्ष द्या.
कुटूंबातील सदस्यांसोबत व्यवसाया संबंधीत महत्वपूर्ण मुद्द्यांवर विचार होईल. भविष्यासंबंधीत योजना आखल्या जातील. कोणताही निर्णय घेताना बजेटचा विचार करा. सरकारी सेवेतील लोकांवर महत्वपूर्ण कारभार येऊ शकतो.

लव फोकस – कैटूंबिक वातावरण आनंदी असेल. प्रेमप्रकरणात एकमेकांच्या भावनांचा विचार करा.
खबरदारी – स्किन एलर्जी होऊ शकते. प्रदूषण आणि उन्हापासून स्वत: चा बचाव करा.
शुभ रंग – हिरा
भाग्यवान अक्षर –
अनुकूल क्रमांक – 3

वृषभ –

घराची देखभाल किंवा सुधारणा कार्यात वेळ जाईल. जवळच्या नातेवाइकांशी भेट होईल, आणि परस्पर सलोखा प्रत्येकाला आनंद देईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात, त्यामुळे दिलासा मिळेल.
आळशीपणामुळे काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. मित्रांच्या बोलण्यावर जास्त विसंबून राहणे देखील तुमचे नुकसान करू शकते. आपल्या निर्णयाला प्राधान्य देणं चांगलं.
आज व्यवसायिक कामे मध्यम राहतील. या काळात तुमच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी योजना करा. जर तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज घरातील वरिष्ठ सदस्याच्या मार्गदर्शनाखाली काम करा.

लव फोकस – कुटूंबासोबत मनोरंजन आणि ऑनलाईन शॉपिग मध्ये आनंदात वेळ जाईल. घरातील वातावरण प्रसन्न असेल.

खबरदारी – आरोग्या संबंधित निष्काळजीपणा तुमच्या चिंतेचं कारण बनेल. सर्दी, खोकल्या सारखे त्रास होतील.

शुभ रंग – जांभळा
भाग्यवान अक्षर –
अनुकूल क्रमांक – 6

मिथुन –

घराची व्यवस्था अधिक चांगली करण्यासंदर्भात कुटुंबीयांशी चर्चा होईल. त्याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम देखील मिळतील. जवळच्या नातेवाईकासोबत वादा सारखी परिस्थिती निर्माण होत असेल, तर ती सोडवण्याचीही योग्य वेळ आहे.

कधी कधी अपेक्षित मनाप्रमाणे कामं न झाल्यामुळे तुम्ही अस्वस्थ होतात. आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवा. भावांसोबत सौहार्दपूर्ण संबंध राखण्यासाठी तुमचे योगदान आवश्यक आहे.

व्यवसायात तुमच्या कामकाजात सुधारणा करण्यासंदर्भात काही योजना आखल्या जातील. तुमच्या मनाप्रमाणे ऑर्डर मिळण्याचीही शक्यता आहे. नोकरीदरा लोकांना जास्त कामाच्या ओझ्यामुळे घरूनही काम करावे लागू शकते.

लव फोकस – घरात सुख – शांतीचे वातावरण राहिल. प्रेमप्रकरणात विभक्त होण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल.

खबरदारी – मायग्रेन आणि सर्वाइकलची समस्या वाढल्याने दिनक्रम त्रासात जाण्याची शक्यता. योगा आणि व्यायामात वेळ घालवा.

शुभ रंग – गुलाबी
भाग्यवान अक्षर –
अनुकूल क्रमांक – 2