
ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक धातूचे स्वतःचे महत्त्व असते आणि त्याचे प्रत्येकासाठी वेगवेगळे फायदे असतात. या धातूंपैकी लोखंड हा शनीचा धातू मानला जातो, सोने हा गुरूचा धातू मानला जातो आणि चांदीवर चंद्राचा प्रभाव असतो.
ज्योतिषशास्त्रात चंद्र हा पाण्याशी संबंधित मानला जातो, हा ग्रह शीतलता आणि चंचलतेचा कारक मानला जातो. राशीमध्ये 12 राशी आहेत आणि काही धातू हे राशीनुसार शुभ मानले जातात, जस काही राशी अग्नि तत्वाच्या, काही जल तत्वाच्या, काही पृथ्वी तत्वाच्या आणि काही वायू तत्वाच्या मानल्या जातात. असेही म्हटले जाते की काही राशींनी चांदी हा धातू धारण करू नये. काही राशींना चांदीचे दागिने न घालण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशींनी चांदी धारण करू नये.
या राशींनी चांदी धारण करू नये
ज्योतिषशास्त्रानुसार,मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी चांदी धारण करू नये. या राशी अग्नि तत्वाशी संबंधित आहेत आणि चांदीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि तो जल तत्वाचे प्रतिनिधित्व करतो.
ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक राशीचा एक विशेष तत्व आणि स्वामी ग्रह असतो. मेष, सिंह आणि धनु राशी या अग्नी तत्वाशी संबंधित आहेत. अग्नि आणि जल तत्व एकमोकांपासून विरुद्ध मानले जातात. म्हणून या राशींना चांदी धारण न करण्याचा सल्ला दिला जातो.
मेष राशी: मेष राशिचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि हे अग्नि तत्वाशी संबंधित राशी आहे. चंद्रचा स्वामी ग्रह चंद्रमा आहे, जो जल तत्वचे प्रतिनिधित्व करतो. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी चांदी धारण केली तर पत्रिकेतील 12 वे घर सक्रिय होते, ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून शक्यतो या राशीच्या लोकांनी चांदी धारण करणे टाळावे.
सिंह राशी: सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि ही राशी अग्नि तत्वाशी संबंधित आहे. सिंह राशीच्या लोकांनी देखील चांदी ग्रहण करू नये असे म्हटले जाते. कारण पैसे खर्च होण्याचे प्रमाण वाढते असं म्हटलं जातं.
धनु राशी: धनु राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती म्हणजे गुरू आहे आणि ही राशी देखील अग्नि तत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे चंद्र ग्रहाशी संबंधीत असलेला चांदी हा धातू ही राशीही धारण करू शकत नाही. पण या राशीच्या लोकांनी जर सोने घातले तर ते त्यांच्यासाठी खूप शुभ ठरू शकते..
पण या राशींपैकी कोणाच्याही पत्रिकेत चंद्र हा अनुकूल असेल तर चांदी घालणे शुभ मानले जाते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)