Nanded : भाजप पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून… नांदेडच्या धर्माबादमध्ये खळबळ
नांदेडच्या धर्माबाद येथे नगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदारांना पैशांचे आमिष दाखवून एका मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर या प्रकरणी आरोप करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात नगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मतदारांना पैशांचे आमिष दाखवून एका मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. ही घटना टीव्ही नाईन मराठीच्या कॅमेरात कैद झाली असून, त्यांच्या पथकाच्या हस्तक्षेपानंतर डांबून ठेवलेल्या मतदारांची सुटका करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्माबाद येथील इनामी मंगल कार्यालयात सकाळी ९ वाजल्यापासून ५०० ते १००० मतदारांना पैशांचे आमिष दाखवून एकत्र बोलावण्यात आले होते. हे मतदार, ज्यात महिला, पुरुष आणि वृद्ध व्यक्तींचा समावेश होता, त्यांना तीन ते चार तास त्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आले होते. काही मतदारांनी तर आपल्याला आदल्या रात्रीपासूनच इथे बोलावून ठेवल्याचे सांगितले. मतदारांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना प्रत्येक मतासाठी सुरुवातीला एक हजार रुपये आणि नंतर तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दीर्घकाळ थांबवूनही त्यांना पैसे देण्यात आले नाहीत.
Published on: Dec 20, 2025 02:22 PM
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
