सकाळी केलेल्या ‘या’ उपायांमुळे होईल आर्थिक तंगीतून सुटका, जाणून घ्या उपाय

तुम्ही जर आर्थिक तंगी अनुभवत असाल तर शास्त्रात यासाठी काही उपाय सांगितले आहे. हे उपाय केल्याने लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते.

सकाळी केलेल्या या उपायांमुळे होईल आर्थिक तंगीतून सुटका, जाणून घ्या उपाय
वास्तुशास्त्र उपाय
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 10, 2022 | 10:43 AM

मुंबई, माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहावी आणि घरात सदैव समृद्धी राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पैसा कमविण्यासाठी (Money Earning) प्रत्त्येक जण मेहेनत करतो पण प्रत्त्येकाच्याच मेहनतीला यश मिळत नाही. त्यामुळे लक्ष्मीची कृपा (Lakshmi Puja) तुमच्यावर सदैव राहावी यासाठी शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय सकाळी केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो आणि आर्थिक तंगी दूर होते. जाणून घेऊया हे उपाय काय आहेत.

तुळशीला जल अर्पण करा

सनातन धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते. सकाळी लवकर उठून तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने आर्थिक संकट दूर होते. तुळशीला आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दररोज सकाळी तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा जप करा – महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधि हर नित्यम्, तुलसी त्वं नमोस्तुते. असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने सौभाग्य, संतती सुख आणि व्यवसायात प्रगती होते.

घरामध्ये समृद्धीसाठी करा हे काम

घरात आणि उत्पन्नात सदैव समृद्धी राहावी यासाठी दररोज तुळशीची पूजा करावी आणि नंतर जल अर्पण करावे. पाणी अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की भांड्यात थोडे पाणी ठेवा आणि नंतर हे उरलेले पाणी संपूर्ण घरात शिंपडा. यामुळे घरामध्ये पवित्रता राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

घराची स्वच्छता करा

स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे अशी म्हण आहे. लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे. सकाळी उठल्यावर आंगण आणि घर स्वच्छ करा. घरात पसारा ठेऊ नका. सकाळी उठल्यावर देवाजवळ दिवा अवश्य लावा. आर्थिक सुबत्ता लाभण्यासाठी देवाला प्रार्थना करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)