जीवनातील दुर्दैव दूर करण्‍यासाठी सोमवार ते रविवार प्रत्येक दिवशी करा हे खास उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, आठवड्याचे सात दिवस वेगवेगळ्या ग्रहांशी आणि देवतांशी संबंधित आहेत. असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीने दिवसानुसार काही सोपे आणि शुभ उपाय केले, तर त्यांच्या जीवनातील अडथळे हळूहळू कमी होऊ लागतात. चला तर मग जाणून घेऊया की रविवार ते शनिवार दरम्यान कोणते उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.

जीवनातील दुर्दैव दूर करण्‍यासाठी सोमवार ते रविवार प्रत्येक दिवशी करा हे खास उपाय
| Edited By: | Updated on: Jun 09, 2026 | 4:02 PM

ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेत ग्रहांची हालचाल आणि स्थिती महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा कुंडलीत ग्रह बलवान असतात तेव्हा मातीचेही सोने होते. पण जेव्हा हेच ग्रह कमकूवत होतात तेव्हा तुम्ही ठरवलेल्या कामांमध्येही अडथळे येतात, आर्थिक अडचणी येतात आणि प्रत्येक प्रयत्नात समस्या निर्माण होतात. जर तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून दुर्दैवाचा सामना करावा लागत असेल किंवा कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल, तर आठवड्याचे सातही दिवस केलेले हे छोटे आणि खात्रीशीर उपाय तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण सोमवार ते रविवार या 7 दिवसांमध्ये कोणते उपाय केले पाहिजे ते जाणून घेऊयात.

रविवार: सूर्य देवाची मनोभावे प्रार्थना करा

रविवार हा वार सूर्यदेवाला समर्पित दिवस मानला जातो . या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला पाणी, लाल फुले आणि थोडे कुंकू अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने आत्मविश्वास वाढतो, आदर वाढतो आणि शासकीय कामातील अडथळे दूर होतात.

सोमवार: भगवान शिवाची पूजा करा

सोमवार हा भगवान शिवाचा सर्वात आवडता दिवस मानला जातो. या दिवशी शिवलिंगाला पाणी, दूध आणि बेलपत्र अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते आणि मानसिक ताण कमी होतो. ज्यांना वारंवार समस्या येतात किंवा ज्यांचे मन अशांत असते, त्यांनी सोमवारी ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा.

मंगळवार: भगवान हनुमानाची उपासना करा

मंगळवार हा बजरंगबली म्हणजेच भगवान हनुमान यांच्या पूजेसाठी विशेष दिवस मानला जातो. या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने आणि हनुमानाला कुंकू व तेल अर्पण केल्याने मंगळ ग्रह बलवान होतो.

बुधवार: गणपतीला दुर्वा अर्पण करा

बुधवार हा भगवान गणेशासाठी समर्पित आहे. या दिवशी भगवान गणेशाला दुर्वा आणि मोदक अर्पण करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने बुद्धिमत्ता, विवेकबुद्धी आणि निर्णयक्षमता सुधारते.

गुरुवार: भगवान विष्णूची उपासना करा

गुरुवार हा वार गुरु ग्रह आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. या दिवशी पिवळे कपडे घालणे, केळीच्या झाडाची पूजा करणे आणि भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे ज्ञान, संपत्ती, वैवाहिक सुख आणि कौटुंबिक समृद्धी वाढते, असा विश्वास आहे.

शुक्रवार: लक्ष्मी मातेला प्रसन्न करा

शुक्रवार हा धन आणि समृद्धीची देवी, लक्ष्मी मातेला समर्पित दिवस आहे. या दिवशी योग्य विधींनी लक्ष्मी मातेची पूजा करा आणि यासोबतच कमळाचे फूल व खीर अर्पण करा. धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवारी घर स्वच्छ केल्याने आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.

शनिवार: शनिदेवांना मोहरीचे तेल अर्पण करा

शनिदेवाच्या पूजेसाठी शनिवार हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे आणि ते तेल शनिदेवाला अर्पण करणे शुभ मानले जाते. गरीब आणि गरजू लोकांना काळे तीळ, उडीद डाळ किंवा ब्लँकेट दान केल्याने शनिदोषाचा प्रभाव कमी होतो, असेही मानले जाते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us