Sankashti Chaturthi : उद्या संकष्टी चतुर्थी, मुहूर्त आणि पूजा विधी

जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्तिभावाने पूजा करतो. भगवान शिव त्यांचे सर्व संकट दूर करतात. हे व्रत भक्तांना सुख आणि सौभाग्य देणारे आणि उत्पन्न वाढवणारे आहे.

Sankashti Chaturthi : उद्या संकष्टी चतुर्थी, मुहूर्त आणि पूजा विधी
चतुर्थी
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 05, 2023 | 9:12 PM

मुंबई :  कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi july 2023) म्हणतात. यंदा चतुर्थी 6 जुलैला म्हणजेच उद्या आहे. या दिवशी श्री गणेशाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. श्री गणेशाला बुद्धीची देवता म्हंटल्या जाते. या शिवाय ते विघ्नहर्ता देखील आहेत. या दिवशी गणपतीची विशेष आराधना केल्याने साधकाच्या जीवनातला अंधःकार दूर होतो. गणेशाची आराधना केल्यास प्रत्येक कार्यात यश मिळते. गणपतीला प्रथम पूजनीय म्हंटल्या जाते. प्रत्त्येक शुभ प्रसंगी गणपतीचे आवाहन अवश्य करतात.

संकष्टी चतुर्थी तिथी आणि शुभ मुहूर्त

यंदा संकष्टी चतुर्थी 6 जुलै रोजी साजरी होणार आहे. तिथी सकाळी 6.31 वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी 3.13 वाजता संपेल.

संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्तिभावाने पूजा करतो. भगवान शिव त्यांचे सर्व संकट दूर करतात. हे व्रत भक्तांना सुख आणि सौभाग्य देणारे आणि उत्पन्न वाढवणारे आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर काहीही न खाता, न पिता, गणपतीसमोर हात जोडून व्रताचा संकल्प घ्या. जिथे पूजा करायची आहे तिथे लाकडी चौरंग ठेवा. त्यावर स्वच्छ पिवळे कापड पसरून लंबोदनाची मूर्ती ठेवावी. प्रसाद, दुर्वा आणि दिवा लावून पूजा करावी. रात्री चंद्र दिसत असताना अर्घ्य द्यायला विसरू नका.

भगवान गणेशाला हिंदू धर्मातील पहिले पूजनीय देवता मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गौरीपुत्राची पूजा केली जाते. गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात. गजाननाच्या कृपेने जीवनात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)