Kumbh Mela 2021 : ‘कुंभ मेळा’, पहिलं शाही स्नान संपन्न, जाणून घ्या पुढील शाही स्नानाची तारीख

| Updated on: Mar 12, 2021 | 8:42 AM

उत्तराखंडच्या हरिद्वार येथे कुंभ मेळाचा शुभारंभ झाला आहे (Kumbh Mela 2021 Shahi Snan). हरिद्वारच्या कुंभसाठी राज्य सरकारने मोठ्या स्तरावर तयारी केली आहे.

Kumbh Mela 2021 : ‘कुंभ मेळा’, पहिलं शाही स्नान संपन्न, जाणून घ्या पुढील शाही स्नानाची तारीख
Kumbh Mela Shahi Snan
Follow us on

देहरादून : उत्तराखंडच्या हरिद्वार येथे कुंभ मेळाचा शुभारंभ झाला आहे (Kumbh Mela 2021 Shahi Snan). हरिद्वारच्या कुंभसाठी राज्य सरकारने मोठ्या स्तरावर तयारी केली आहे. काल महाशिवरात्री होती आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पहिलं शाही स्नान सर्व भाविकांनी केलं. देशभरातील लोकांनी पवित्र गंगा नदीत डुबकी लावली. कुंभ मेळ्यात सर्वात मोठं आकर्षणाचं केंद्र हे शाही स्नान असतं (Uttarakhand Kumbh Mela 2021 Shahi Snan Know The All Dates For Shahi Snan).

या शाही स्नानसाठी देशभरातील आखाडे आणि साधुंचा गट कुंभ मेळात पोहोचतात आणि शाही स्नान करतात. शाही स्नानसाठी येणाऱ्या आखाड्यांची यात्रा भव्य आणि आकर्षक असते. जे भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाची झलक संपूर्ण जगाला दाखवतात.

या कुंभ मोळात अनेक गोष्टी पाहायला मिळतात. मोठा जनसमूह, नागा बाबा, विद्वानांचे प्रवचन, अखाडोंचे लंगर आणि धर्मावर अनेक चर्चा या मेळाची विशेषता असते. पण, आज आम्ही तुम्हाला शाही स्नानाच्या पुढील तारखांबाबत सांगणार आहोत. चला जाणून घेऊ पुढील शाही स्नानाची तारीख

हरिद्वार कुंभचे शाही स्नान

1. पहिलं शाही स्नान

हरिद्वार कुंभचं पहिलं शाही स्नान 11 मार्च म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी झालं. हा दिवस यासाठीही महत्त्वाचा आहे कारण या दिवशी महाशिवरात्री आहे.

2. दूसरं शाही स्नान

हरिद्वार कुंभचं दूसरं शाही स्नान 12 एप्रिलला सोमवारी आहे. हा दिवसही अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या दिवशी सोमवती अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी स्नान-दान केल्यामे मोठं पुण्या मिळते अशी मान्यता आहे. या दिवशी लोक विशेषकरुन पवित्र नदीत स्नान करतात आणि आपल्या पित्रांसाठी यज्ज्ञ करतात. पूर्वजांच्या तृप्तीसाठी पिंडदान केले जाते.

3. तिसरं शाही स्नान

हरिद्वार कुंभचं तिसरं शाही स्नान 14 एप्रिलला बुधवारी आहे. या दिवशी मेष संक्रांत आहे. या दिवशीही संपूर्म जगातून आलेले साधू आणि संत पवित्र गंगा नदीमध्ये मोठ्या आस्थेने डुबकी लावतात.

4. चौथं आणि अखेरचं शाही स्नान

हरिद्वार कुंभचं चौथं आणि अखेरचं शाही स्नान 27 एप्रिलच्या दिवशी मंगळवारी असेल. या दिवशी बैशाख पौर्णिमा आहे.

कुंभ दर 12 वर्षानंतर एकदा आयोजित केला जातो. पण, यावेळी 11 वर्षांनंतर याचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, यावेळी कोरोना संसर्गामुळे भाविकांना अनेक नियमांचं पालन करावं लागत आहे आणि नेहमीच्या तुलनेत यंदा गर्दीही कमी आहे. पण, उत्साह आणि आनंदात काहीही कमी नाही.

Uttarakhand Kumbh Mela 2021 Shahi Snan Know The All Dates For Shahi Snan

संबंधित बातम्या :

Mahashivaratri 2021 | महाकालेश्वराची जगप्रसिद्ध ‘भस्म आरती’, वाचा कशी सुरु झाली ‘ही’ आरती…

Mahashivratri 2021 | त्र्यंबकेश्वर, औंढा-नागनाथ ते भीमाशंकर, महाशिवरात्रीलाही मंदिरं भाविकांसाठी बंद