AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahashivaratri 2021 | महाकालेश्वराची जगप्रसिद्ध ‘भस्म आरती’, वाचा कशी सुरु झाली ‘ही’ आरती…

उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर वसलेले ‘महाकालेश्वर मंदिर’ भगवान महादेवाच्या भक्तांसाठी एक विशेष तीर्थक्षेत्र आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन या पुरातन शहरातील ‘महाकालेश्वर मंदिर’ तिथल्या भस्म आरतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

Mahashivaratri 2021 | महाकालेश्वराची जगप्रसिद्ध ‘भस्म आरती’, वाचा कशी सुरु झाली 'ही' आरती...
महाकालेश्वर मंदिर
| Updated on: Mar 11, 2021 | 2:25 PM
Share

मुंबई : उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर वसलेले ‘महाकालेश्वर मंदिर’ भगवान महादेवाच्या भक्तांसाठी एक विशेष तीर्थक्षेत्र आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन या पुरातन शहरातील ‘महाकालेश्वर मंदिर’ तिथल्या भस्म आरतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. ही आरती दररोज पहाटे 4 वाजता भगवान महाकालेश्वरची आराधना करण्यासाठी केली जाते. हे एक ज्योतिर्लिंग स्थान आहे. जे प्रकाशाचे दिव्य रूप मानले जाते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग देशातील 12 प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. चला तर जाणून घेऊया भस्म आरतीचे महत्व आणि त्यामागचे रहस्य…(Mahashivaratri 2021 know the story about  Ujjain mahakaleshwar bhasma aarti)

भस्म आरती म्हणजे काय?

भस्म आरती हा आरतीचा एक विशेष प्रकार आहे, जी उज्जैनमध्ये ब्रह्म मुहूर्ताच्या (सूर्योदय होण्याच्या दोन तास आधी) दरम्यान केली जाते. पुजारी पवित्र मंत्रांचे पठण करताना महादेवाला पवित्र राख (भस्म) अर्पण करतात. आरती करत असताना असे वातावरण तयार होते, जणू उपस्थित भाविकांना आपल्या समोर भगवंताचे अस्तित्व असल्याचे जाणवते.

भस्म आरतीचे महत्त्व काय आहे?

धार्मिक मान्यतानुसार भगवान शिवाला ‘काल’ किंवा ‘मृत्यूचे स्वामी’ मानले जातात. याच कारणास्तव, ‘शव’मधून ‘शिवा’ हे नाव निर्माण केले गेले आहे. महादेव यांच्या म्हणण्यानुसार, शरीर नश्वर आहे आणि ते एक दिवस राख बनणार आहे आणि शिवाशिवाय कोणाचे काळावर नियंत्रण नाही. म्हणून भगवान शिव यांची या पवित्र राखेने पूजा केली जाते (Mahashivaratri 2021 know the story about  Ujjain mahakaleshwar bhasma aarti).

भस्म आरती बद्दलच्या मान्यता…

– असे म्हणतात की, भगवान शिव यांना जागृत करण्यासाठी भस्म आरती केली जाते, म्हणून ही आरती पहाटे 4 वाजता केली जाते.

– सध्याच्या काळात महाकालेश्वराची भस्म आरती गायीच्या शेअनाच्या गोवऱ्या, शमी, पिंपळ, पलाश, वड, अमलताश आणि बोराची लाकडे जाळून त्यातून तयार झालेल्या राखेतून केली जाते.

– असे मानले जाते की, बर्‍याच वर्षांपूर्वी स्मशानभूमीतून राख आणून ही आरती केली जायची, पण आता गोवऱ्या आणि झाडांच्या लाकडाच्या राखेनी आरती केली जाते.

– नियमांनुसार महिला भस्म आरती पाहू शकत नाहीत. म्हणून, त्यांना काही काळ चेहरा झाकावा लागतो.

– आरती दरम्यान पुजारी एक वस्त्र धोतीमध्ये असतात. या आरतीमध्ये इतर कपडे घालण्याचा कोणताही नियम नाही.

भस्म आरतीचे रहस्य

पौराणिक कथांनुसार असे म्हटले जाते की, पुरातन काळात उज्जैनवर महाराज चंद्रसेन राज्य करत होते, जे भगवान शिवाचे परमभक्त होते. केवळ चंद्रसेनच नव्हे तर, उज्जैनच्या लोकांनीही भगवान शिवाची खूप उपासना केली. एकदा रिपुदमन राजाने चंद्रसेनच्या राजवाड्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यामुळे प्रजेचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत लोकांना भगवान शिवाची आठवण आली. त्यावेळी भगवान शिव स्वत: तेथे प्रकट झाले आणि त्या दुष्ट राक्षसाचा वध केला. यानंतर, शिवाने राक्षसांच्या राखेतून स्वतःचा शृंगार केला आणि ते उज्जैनमध्ये कायमचे स्थायिक झाले. तेव्हापासून असे मानले जाते की, त्या जागेचे नाव महाकालेश्वर असेल आणि यामुळेच येथे भस्म आरती सुरू झाली.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Mahashivaratri 2021 know the story about  Ujjain mahakaleshwar bhasma aarti)

हेही वाचा :

Mahashivratri 2021 : जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जिथे महादेवासमोर नंदी नाही!

Mahashivratri 2021 | त्र्यंबकेश्वर, औंढा-नागनाथ ते भीमाशंकर, महाशिवरात्रीलाही मंदिरं भाविकांसाठी बंद

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.