Mahashivratri 2021 | आर्थिक, कौटुंबिक समस्या सुटतील, नोकरीतही यश लाभेल, महाशिवरात्रीला ‘हे’ उपाय करा

वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीचा सण उद्या 11 मार्चला आहे (Mahashivratri 2021 Special Upay).

Mahashivratri 2021 | आर्थिक, कौटुंबिक समस्या सुटतील, नोकरीतही यश लाभेल, महाशिवरात्रीला 'हे' उपाय करा
दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या तिथीला महाशिवरात्री साजरी होती. हा दिवस महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित असतो.

मुंबई : वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीचा सण 11 मार्चला आहे (Mahashivratri 2021 Special Upay). दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हा दिवस महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित असतो (Mahashivratri 2021 Special Upay To Get Rid Of All Your Problems In Life ).

मान्यता आहे की या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. महादेवाचे भक्त महाशिवरात्रीला उपवास ठेवतात, त्यांची विधीवत पूजा करतात आणि रात्री जागरण करुन महादेव आणि देवी पार्वतीच्या विवाहाचा उत्सव साजरा करतात.

महाशिवरात्रीच्या रात्री त्यांचे भक्त भगवान शंकरजींचे ध्यान आणि भजन करतात. या दिवशी पूर्ण मनोभावे महादेवाची पूजा-अर्चना केली तर ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, असं सांगितलं जातं. जर तुमच्या आयुष्यात अनेक काळापासून समस्या असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय करुन या समस्यांपासून सुटका मिळवू शकतात.

आर्थिक संकट दूर करण्यासाठी

गेल्या अनेक काळापासून कुटुंबात आर्थिक समस्या असतील तर तुम्ही ‘ॐ शं शिवाय शं ॐ नमः’ मंत्राचा कमीत कमी 21 वेळा जाप करा. शक्य असेल तर पाच, सात, 11 किंवा 21 माळाही करु शकता. पण हा जाप करताना रुद्राक्षच्या माळेनेच करावी. त्याशिवाय, बेलफलने हवन करा.

वैवाहिक जीवनात आनंद आणण्यासाठी

जर तुमच्या वैवाहिक जीवनत कुठल्या प्रकारची समस्या असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगवर जल अर्पित करा आणि बेलाच्या देठावर थोडं तूप वाहा. त्याशिवाय ‘ॐ शिवाय नमः ॐ’ मंत्राचा कमीतकमी 51 वेळा जाप करा.

उत्तम जोडीदारासाठी

जर तुम्ही उत्तम जोडीदाराच्या शोधात आहात तर महाशिवरात्रीपेक्षा चांगला कुठला दिवस नाही. या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाच्या विवाहाचा दिवस आहे. या दिवशी देवी पार्वती आणि महादेव या दोघांची विधीवत पूजा करा. देवीला नारळ चढवा. त्यानंतर ‘निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं, चिदाकाश माकाश वासं भजेऽहं’ या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जाप करा आणि देवाकडे चांगल्या जोडीदारासाठी प्रार्थना करा.

विशेष कार्य सिद्धीसाठी

जर तुम्ही गेल्या अनेक काळापासून कुठलं काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असाल पण त्यात तुम्हाला यश येत नसेल तर महाशिवरात्रीच्या पवित्र सणाच्या दिवशी महादेवाची विधीवत पूजा करण्यासोबतच तिळीने हवन करा आणि बेलाच्या झाडाची पूजा करा. ‘ॐ शं शंकराय भवोद्भवाय शं ॐ नमः’ या मंत्राचा जाप करा (Mahashivratri 2021 Special Upay To Get Rid Of All Your Problems In Life ).

ऑफिसमध्ये चांगल्या परफॉर्मेंससाठी

जर ऑफिसमध्ये अथक प्रयत्नांनंतरही तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम मिळत नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी बालू, राख, गोवऱ्या, गुळ आणि लोणी मिसळून एका छोटासा शिवलिंग बनवा आणि याची विधीवत पूजा करा. या दरम्यान महादेवाच्या या मंत्राचा जाप करा, ‘नमामिशमीशान निर्वाण रूपं, विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपं’. पूजा केल्यानंतर सर्व वस्तू त्या दिवशी त्यात्या स्थानावर ठेवा. दुसऱ्या दिवशी नदीत प्रवाहित करा.

Mahashivratri 2021 Special Upay To Get Rid Of All Your Problems In Life

संबंधित बातम्या :

Mahashivaratri 2021 | महादेवाचे असे मंदिर जिथले शिवलिंग मूळ जागेवरून पुढे सरकते, वाचा या मंदिराचे अद्भुत किस्से…

Mahashivratri 2021 | घरात शिवलिंग ठेवण्यापूर्वी वाचा महत्त्वाचे नियम, अन्यथा निर्माण होतील अनेक अडचणी!  

MahaShivratri 2021 | तुळशीची पानं आणि केतकीचं फुलं महादेवाला वर्ज्य, जाणून घ्या या मागील पौराणिक कथा

Mahashivaratri 2021 | नक्षत्रांच्या पंचकादरम्यान साजरी होणार यंदाची महाशिवरात्री, जाणून घ्या काय आहे ‘हा’ मुहूर्त!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI