AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varuthini Ekadashi 2023 : वरूथिनी एकादशीली जुळून येत आहे विषेश योग, मुहूर्त आणि महत्त्व

वरुथिनी एकादशी तिथीचे व्रत हिंदू धर्मात फार महत्वाचे आहे. या एकादशीला भगवान विष्णूच्या वराह अवताराची पूजा केली जाते. या दिवशी जल दान केल्याने अनेक यज्ञांचे फळ एकत्र मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

Varuthini Ekadashi 2023 : वरूथिनी एकादशीली जुळून येत आहे विषेश योग, मुहूर्त आणि महत्त्व
एकादशीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 15, 2023 | 10:26 AM
Share

मुंबई : चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi 2023) म्हणतात. या वेळी 16 एप्रिल रोजी वरुथिनी एकादशीचे व्रत केले जाणार आहे. वरुथिनी एकादशी तिथीचे व्रत हिंदू धर्मात फार महत्वाचे आहे. या एकादशीला भगवान विष्णूच्या वराह अवताराची पूजा केली जाते. या दिवशी जल दान केल्याने अनेक यज्ञांचे फळ एकत्र मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. यावेळी वरुथिनी एकादशीला अनेक दुर्मिळ योगायोगही घडत आहेत. वरुथिनी एकादशी व्रताची शुभ मुहूर्त, उपासना पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया.

वरुथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त

वरुथिनी एकादशी 15 एप्रिल रोजी रात्री 8:45 वाजता सुरू होईल आणि 16 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:14 पर्यंत सुरू राहील. त्यामुळे 16 एप्रिलला म्हणजेच रविवारीच उपवास केला जाणार आहे. रविवारी सकाळी 7:32 ते 10:45 पर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. वरुथिनी एकादशीची पारण वेळ 17 एप्रिल रोजी पहाटे 5:54 ते 8:29 पर्यंत आहे.

दुर्मिळ योगायोग

वरुथिनी एकादशीनिमित्त त्रिपुष्कर योग तयार होणार आहे. हा योग 17 एप्रिलला पहाटे 4.07 ते 17 एप्रिलला पहाटे 5.54 पर्यंत राहील. या एकादशीला त्रिपुष्कर योग तयार होणे अत्यंत शुभ मानले जाते.

पूजेची पद्धत

जो वरुथिनी एकादशीचे व्रत करतो त्याला बैकुंठधामची प्राप्ती होते असे मानले जाते. या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे आणि आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. यानंतर मंदिरात जाऊन व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर चंदन, अक्षत, फुले आणि फळांनी भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी. वरुथिनी एकादशीलाही पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. भगवान विष्णूला पंचामृत अर्पण केल्यानंतर मधुराष्टकचा पाठ करा. या दिवशी भगवान विष्णूच्या हजार नामांचा जपही करावा. व्रत पाळणाऱ्या लोकांनी या दिवशी रस्त्यावरून जाणाऱ्यांना पाणी दान करावे. उपवास करणाऱ्या लोकांनी या दिवशी फक्त फळे खावीत.

एकादशी व्रताचे महत्त्व

वरुथिनी एकादशीचे पालन केल्याने इच्छित फळ मिळते. वरुथिनी एकादशी पाळल्याने मोक्ष प्राप्त होतो. जाणूनबुजून किंवा नकळत केलेली पापे, ज्याबद्दल कोणतीही माहिती नाही, ते सर्व दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन