वसंत पंचमीला जुळून येतोय विशेष योग, या गोष्टी अवश्य पाळा

| Updated on: Feb 02, 2024 | 3:58 PM

वसंत पंचमी हा सण माता सरस्वतीला समर्पित आहे. या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा केल्याने बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो.

वसंत पंचमीला जुळून येतोय विशेष योग, या गोष्टी अवश्य पाळा
वसंत पंचमी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात वसंत पंचमी (Vasant Panchami) हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो. हा दिवस वसंत ऋतुची सुरुवात मानला जातो. वसंत पंचमी हा सण माता सरस्वतीला समर्पित आहे. या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा केल्याने बुद्धी आणि ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो. शास्त्रानुसार माता सरस्वतीचा जन्म बसंत पंचमीच्या दिवशी झाला होता. यावेळी, वसंत पंचमीच्या दिवशी असे अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामध्ये केलेल्या उपासनेचे अनेक पटींनी अधिक फल प्राप्त होते.

या तिथीला आहे वसंत पंचमी

पंचांगानुसार, माघ शुक्ल पंचमी म्हणजेच वसंत पंचमी तिथी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:41 वाजता सुरू होईल आणि 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:10 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी सण साजरा केला जाणार आहे. यंदा रेवती, अश्विनी नक्षत्र, शुभ योग आणि शुक्ल योग वसंत पंचमीला येत आहेत. या शुभ योगांमध्ये बसंत पंचमीची उपासना केल्यास खूप शुभ परिणाम प्राप्त होतील. देवी सरस्वती देशवासीयांना ज्ञान, बुद्धी आणि सौभाग्य देईल.

वसंत पंचमीच्या दिवशी या गोष्टी लक्षात ठेवा

वसंत पंचमीच्या दिवशी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जाणून घेऊया वसंत पंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये.

हे सुद्धा वाचा
  • वसंत पंचमीच्या दिवशी पितृ तर्पण केल्यास पितृदोष दूर होतो. पितरांचा आशीर्वाद मिळतो.
  • वसंत पंचमीच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये. तसेच या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे.
  • वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते.
  • देवी सरस्वतीच्या पूजेमध्ये पिवळी फुले आणि पिवळी मिठाई अर्पण करा.
  • वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी डोळे उघडताच प्रथम हाताच्या तळव्याकडे पहा.
  • वसंत पंचमीच्या दिवशी कोणाला शिवीगाळ करू नका.
  • वसंत पंचमीच्या दिवशी मांसाहार किंवा मद्य सेवन करू नये.
  • वसंत पंचमीच्या दिवशी झाडे तोडणे अत्यंत अशुभ मानले जाते. अशी चूक करू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)