Vastu Shastra : तुमच्याही घरात या गोष्टी घडतात का? वेळीच व्हा सावध, अन्यथा व्हाल बरबाद

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात आपल्या कळत नकळत अशा काही घटना घडत असतात, ज्याचा संबंध थेट तुमच्या आर्थिक प्राप्तीशी असतो, अशा घटना जर सतत घडून येत असतील तर तुम्ही कितीही पैसा कमावला तर तो तुमच्या घरात टिकणार नाही.

Vastu Shastra : तुमच्याही घरात या गोष्टी घडतात का? वेळीच व्हा सावध, अन्यथा व्हाल बरबाद
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 8:19 PM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी, किंवा तुमच्या घरात ज्या काही वस्तू आहेत, त्या प्रत्येक वस्तूची दिशा कोणती असावी, एवढंच सांगण्यात आलेलं नाही. तर अनेकदा आपल्या काही चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. हा वास्तुदोष नेमका कशामुळे निर्माण होतो? आणि तो दूर करण्याचे उपाय काय आहेत? याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या कळत नकळत आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात, ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, वास्तुदोष निर्माण होतो. अशा स्थितीमध्ये तुम्ही कितीही पैसा कमावला तरी देखील तुमच्या घरात पैसा टिकत नाही. अशा गोष्टी घडू नये, यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

सतत पाणी गळती – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात सतत पाणी गळती होत असेल तर हा एक अशुभ संकेत आहे. ज्या घरात सतत पाणी गळती होते, त्या घरात पैसा कधीही टिकत नाही. तुम्ही कितीही पैसा कमवा तो पैसा कोणत्या न कोणत्या कारणांसाठी खर्च होतो. तसेच ज्या घरात सतत पाणी गळती होते, त्या घरातील कुटुंब प्रमुखाचा चंद्र हा कमजोर होतो. चंद्र कमजोर झाल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. त्यामुळे जर तुमच्या घरात कुठेही पाण्याचं लिकेज होत असेल तर त्याची ताबडतोब दुरूस्ती करून घ्यावी, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. घरात सतत होणारी पाण्याची गळती किंवा जास्त पाण्याचा वापर हे वास्तुशास्त्रामध्ये अशुभ माण्यात आलं आहे.

Loading...

घरात जाळे – जर तुमच्या घरात वारंवार जाळे होत असतील आणि तुम्ही जर तुमच्या घराची स्वच्छता करत नसाल घरात जिकडे तिकडे जाळेच दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, कारण अशा घरात कधीही बरकत नसते. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावं, घरात कुठेही जाळे होऊ देऊ नये. जे घर स्वच्छ असतं, अशा घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो, अशा घरात कधीही पैशांची कमी पडत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us