Vastu Shastra : नवं घर खरेदी केलंय? मग गृहप्रवेशापूर्वी या तीन गोष्टी कराच, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
अनेकांचं स्वप्न असतं आपलं देखील हक्काचं एखादं सुंदर घर असावं, अनेकजण आपल्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड कष्ट करतात. पैसे जमा करतात आणि नव्या घराचं स्वप्न साकार करतात. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही नवं घर खरेदी करतात, तेव्हा घरात गृहप्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी करणं गरजेचं असतं.

अनेकांचं स्वप्न असंत की आपल्या हक्काचं एक तरी घर असावं, घराचं स्वप्न साकार करण्यासाठी लोक प्रचंड मेहनत करतात. पैसे जोडतात आणि त्याच पैशांमधून घर खरेदी करतात. काही जणांना नवं घर भाग्याचं ठरतं नव्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर त्या कुटुंबाची भरभराट होते. घराला बरकत येते. परंतु अशी देखील काही घर असतात, तुम्ही घरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अचानक काही अडचणी जाणवायला लागतात. खर्चाचं प्रमाण अचानक वाढतं, काहीही कारण नसताना गृहकलह देखील वाढतो. अशा अडचणी तुमच्या आयुष्यात येऊ नये, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा तुम्ही नवं घर खरेदी करता, तेव्हा घरात गृहप्रवेश करण्यापूर्वी तुम्ही जर या गोष्टी केल्या तर तुम्हाला बरकत प्राप्त होते, घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सुख, समृद्धी आणि शांती येते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, आज आपण अशाच काही उपायांबद्दल वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
चांदीची वस्तू – वास्तुशास्त्रामध्ये चांदीला अत्यंत शुभ माण्यात आलं आहे, चांदी सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून घराचं संरक्षण करते. चांदी सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला नष्ट करते, त्यामुळे घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते. सकारात्मक ऊर्जेचा शुभ प्रभाव हा तुमच्या घरावर पडतो. वाईट शक्तिंपासून घराचं संरक्षण करण्यासाठी नव्या घरात राहायला जाण्यापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याखाली एखादी चांदीची वस्तू पुरून ठेवावी, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, यामुळे तुमचं सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून संरक्षण होईल.
देवतेंचे फोटो – नव्या घरात गृहप्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी तेथील देवघरात देवी-देवतेंचे फोटो किंवा मूर्ती ठेवाव्यात. यामुळे देवी देवतेंच्या आशीर्वादाने तुमच्या नव्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होईल. तुमच्या घराला बरकत प्राप्त होईल.
अन्नदान – हिंदू धर्मामध्ये अन्नदानाला सर्वात श्रेष्ठदान असं म्हटलं आहे, ज्या घरात अन्नदान होतं, त्या घरात कधीही अन्न धान्याची कमी राहत नाही, असं घर नेहमी धान्याने भरलेलं राहंत, त्यामुळे गृहप्रवेशापूर्वी एकदा अन्नदान देखील करावं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)