Vastu Shastra : या तीन गोष्टी जर घरात दिसल्या तर असतो धन प्राप्तीचा योग, वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जर धनाची प्राप्ती होणार असेल, किंवा तुमच्या आयुष्यात अकस्मात धन योग असेल तर अशा गोष्टींपूर्वी तुम्हाला काही विशिष्ट संकेत मिळतात. चला तर मग जाणून गेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं कायं सांगितलं आहे? त्याबद्दल.

हिंदू धर्मशास्त्रात वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडतात, त्या अचानक घडत नाहीत, त्यापूर्वी तुम्हाला त्याचे काही न काहीतरी संकेत हे मिळत असतात. असे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजेत. जर समजा तुमच्या आयुष्यात एखादी दुर्घटना घडायची असेल तर तिचे देखील तुम्हाला काहीतरी विशिष्ट संकेत मिळतात, आणि समजा तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार असतील, तुम्हाला महत्त्वाच्या कामात यश प्राप्त होणार असेल किंवा तुमच्या आयुष्यात अचानक मोठा धन प्राप्तीचा योग असेल तर अशा गोष्टींचे संकेत देखील तुम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळत असतात. हे संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजे, या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करून नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण जर तुमच्या आयुष्यात एखादी शुभ घटना घडणार असेल तर त्यापूर्वी तुम्हाला काय संकेत मिळू शकतात? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
काळ्या मुंग्या – जर तुमच्या घरात वारंवार काळ्या मुंग्या निघत असतील तर हा एक अतिशय शुभ संकेत आहे, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक धन प्राप्तीचा योग येणार असतो, किंवा तुमची आर्थिक प्राप्ती वाढणार असते, तेव्हा असा संकेत तुम्हाला मिळतो. त्यामुळे घरात काळ्या मुंग्या दिसणं हे अतिशय शुभ मानलं जातं, असं वास्तुशास्त्र सांगतं.
स्वप्न- वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने, भरपूर पैसा अशा गोष्टी येत असतील, आणि अशी स्वप्न जर तुम्हाला वारंवार पडत असतील तर हा अतिशय शुभ संकेत मानला जातो. याचाच अर्थ तुम्हाला आता लवकरच मोठी धन प्राप्ती होऊ शकते, तुमच्या आयुष्यात अचानक धनप्राप्तीचा योग येऊ असा होतो. त्यामुळे हा एक अतिशय शुभ संकेत असल्याचं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
स्वप्नात देवी देवतांचं दर्शन – जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये देवी देवतांचं दर्शन होत असेल तर हा देखील एक अतिशय शुभ संकेत मानला जातो. यामुळे अकस्मात धन प्राप्तीचा योग निर्माण होऊ शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)