Vastu Shastra : या चार वस्तू घरात ठेवा, कर्जातून मिळेल मुक्ती, प्रत्येक कामात यश

वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळू शकतं, अशाच काही उपायांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

Vastu Shastra : या चार वस्तू घरात ठेवा, कर्जातून मिळेल मुक्ती, प्रत्येक कामात यश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2025 | 1:29 PM

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश पाहिजे असतं. त्यासाठी लोक प्रचंड कष्ट करतात. मात्र अनेकदा असं होतं की, तुम्ही खूप कष्ट करून देखील तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होत नाही. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार असं यामुळे होतं की, तुमच्या आसपास सतत एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते, आणि त्या ऊर्जेचा प्रभाव हा तुमच्या नशीबावर पडत असतो. जर तुमच्या आसपास सकारात्म ऊर्जा असेल तर त्याचा प्रभाव हा सकारात्मक पडणार, मात्र जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा प्रभाव हा तुमच्या नशीबावर नकारात्मक पडणार. घरात ठेवलेल्या योग्य वस्तू आणि त्यांची दिशा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तुमच्या घरात सकारात्म ऊर्जा असेल तर तुम्हाला सुख, शांती आणि यशाची प्राप्ती होते. चला तर आज आपण अशा चार वस्तूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या घरात असतील तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा

वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला धन आणि समृद्धीचं प्रतिक मानलं गेलं आहे. उत्तर दिशेचे स्वामी हे स्वत: कुबेर आहेत. जर तुम्ही आर्थिक समस्यांमुळे त्रस्त असाल तर घराच्या उत्तर दिशेला कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. असं मानलं जातं की, यामुळे कुबेर देवता प्रसन्न होऊन, तुमची सर्व पैशांमुळे अडलेली कामे मार्गी लागतात, व्यापार आणि नोकरीमध्ये फायदा होतो.

श्री यंत्र

श्री यंत्राला ज्योतिष आणि वास्तू शास्त्र दोन्हीमध्ये देखील खूप शक्तिशाली मानन्यात आलं आहे. श्री यंत्राला देवी लक्ष्मी मात्राच प्रति रूप देखील मानलं जातं. तुमच्या घरात जर श्री यंत्र असेल तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अखंड सुरू राहातो. श्री यंत्राची स्थापना ही तुमच्या पुजा घरात, उत्तर दिशेला करावी. ज्यामुळे तुमच्या प्रगतीमधील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.

तुळशीचं झाड

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीच्या झाडाला प्रचंड महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. ज्या घरात तुळशीचं झाडं असतं, त्या घरावर सदैव विष्णू आणि लक्ष्मी मातेची कृपा राहाते. त्या घरात कधीही पैशांची अडचण येत नाही, असं वास्तुशास्त्र सांगतं. तुळशीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

धातुचं कासव

वास्तुशास्त्रासोबतच फेंगशुईमध्ये देखील धातुच्या कासवाला खूप शुभ मानलं गेलं आहे. धातुचं कासव हे दीर्घायुष्य, स्थिरता आणि धनाचं प्रतिक मानलं जातं. धातुपासून तयार करण्यात आलेलं कासव हे घराच्या उत्तर दिशेला ठेवावं असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.