Vastu Shastra : दर शनिवारी करा हे 3 उपाय, शनिदोष होईल झटक्यात दूर, वास्तुशास्त्र काय सांगतं?
शनि देवांना कर्मफळ दाता असं देखील म्हटलं जातं. व्यक्तीचं कर्म जसं आहे, तसंच फळ शनिदेव देत असतात. त्यामुळे माणसाने नेहमी आपलं कर्म चांगलं ठेवावं, असा सल्ला अनेक अध्यात्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा देण्यात आला आहे. आज आपण शनिदोष दूर करण्यासाठीचे काही उपाय जाणून घेणार आहोत.

शनि देवांना कर्मफळ दाता असं म्हटलं जातं. शनिदेव हे प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात. त्यामुळेच माणसाने आपलं कर्म हे नेहमी चांगलं ठेवलं पाहिजे, असं म्हटलं जातं. मात्र जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनिदोष निर्माण झाला तर त्याच्या आयुष्यात अनेक संकट येऊ शकतात. ही संकट दूर करण्यासाठी आणि शनि महाराजांची कृपा सदैव आपल्यावर राहावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण त्यातीलच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शनिदेव जेव्हा आपल्या एखाद्या भक्तावर प्रसन्न होतात, तेव्हा त्याचं नशीब चमकत. त्याला त्याच्या आयुष्यात कुठल्याच सुखाची कमी राहत नाही, मात्र जर घरात शनिदोष निर्माण झाला तर मग अडचणी वाढतात. शनिदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे शनिदेव प्रसन्न होऊन तुमच्या अडचणी दूर होतील, असा दावा वास्तुशास्त्रात करण्यात आला आहे.
पिंपळ वृक्ष – दर शनिवारी पिंपळ वृक्षाखाली तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिदेवांची मनोभावे पूजा करावी. हा सोपा उपाय काही शनिवार सातत्याने केल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. शनि देवांचा आशीर्वाद मिळतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
घरात शनि देवाचा फोटो – वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जर शनि देवांचं दर्शन घ्यायचं आहे, तर तुम्ही ते शनि देवांच्या मंदिरामध्येच जाऊन घ्यावं. तुमच्या घरामध्ये शनि देवांचा फोटो, तसेच देवघरामध्ये कधीही शनि देवांची मूर्ती असू नये, यामुळे घरात शनिदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
घराची पश्चिम दिशा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची पश्चिम दिशा ही शनि देवांची दिशा असते, त्यामुळे या दिशेला कधीही अवजड सामान ठेवू नये, घराची पश्चिम दिशा ही नेहमी मोकळी असावी, असा सल्ला देखील वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)