Vastu Shastra : नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी करा हे सोपे उपाय, आयुष्यात कधी पैसा कमी पडणार नाही

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं माण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल, घरातील वस्तूंची दिशा देखील वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होत नाही, आज आपण अशाच काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी करा हे सोपे उपाय, आयुष्यात कधी पैसा कमी पडणार नाही
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 8:57 PM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र महत्त्वाचं माण्यात आलं आहे. असं म्हटलं जातं, की जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार असेल. घराचा मुख्य दरवाजा, स्वयंपाक घर, बेडरूम, एवढंच नाही तर तुमच्या घरातील तिजोरी या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये ठरवून दिलेल्या नियमानुसार असतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमी पडत नाही, तसेच इतरही वास्तुदोषांपासून तुमचं संरक्षण होतं. नवीन घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. नवीन घर घेण्यासाठी अनेकजण आपल्या आयुष्याची सर्व जमापुंजी खर्च करतात. आपल्या घराचं स्वप्न साकार करतात. परंतु जर अशा घरात वास्तुदोष असेल तर त्याचा परिणाम हा तुमच्या सुखी जीवनावर होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

घोड्याची नाळ – वास्तुशास्त्रामध्ये घोड्याच्या नाळीला अत्यंत शुभ मानलं जातं. घोड्याची नाळ म्हणजे घोड्याच्या पायाच्या तळव्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये, म्हणून एक अर्ध वर्तुळाकार लोखंडी पट्टी ठोकलेली असते, जेव्हा ही पट्टी ढिल्ली होते, किंवा खराब होते, तेव्हा ती पट्टी काढून तिच्या जागी दुसरी पट्टी ठोकली जाते. ही वापरलेली जी नाळ आहे, ती जर घराच्या मुख्य उंबऱ्याला ठोकल्यास सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच पैशांच्या देखील समस्या दूर होतात.

Loading...

मिठाचं पाणी – जेव्हा तुम्ही नव्या घरात राहायला जातात, तेव्हा नियमितपणे दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर मुख्य घराच्या दरवाजाची चौकट ही पाण्याने स्वच्छ पुसून काढवी, ती पाण्याने पुसून काढत असताना त्या पाण्यामध्ये थोडं सैंधव मीठ टाकावं, यामुळे तुमच्या घरात येणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असं मानलं जातं. सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुमच्या घराचं संरक्षण होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us