Vastu Shastra : पिंपळाचे झाड का तोडू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?

पिंपळाच्या झाडाचे अनेक आयुर्वेदिक उपाय आहेत, आयुर्वेदिक उपायांबरोबरच पिंपळाच्या झाडाचं धार्मिक महत्त्व देखील मोठं आहे. पिंपळाच्या झाडाला नियमित जल अर्पण केल्यास पितृदोष दूर होतो. तसेच दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास शनि देवांची देखील कृपा होते.

Vastu Shastra : पिंपळाचे झाड का तोडू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?
पिंपळाचं झाड का तोडू नये?
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Dec 01, 2025 | 7:27 PM

पिंपळ हा प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन देणारा आणि मोठ्या वृक्षांच्या श्रेणीमध्ये येणारा वृक्ष आहे. पिंपळाच्या झाडाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत, आयुर्वेदिक फायद्यासोबतच त्याचं मोठं धार्मिक महत्त्व देखील आहे. पिंपळाची सावली देखील प्रचंड शितल असते. मात्र अशा या वृक्षाबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. काही ठिकाणी पिंपळ उगवणं शुभ माण्यात येतं तर काही ठिकाणी पिंपळ उगवणं अशुभ मानलं जातं. जेव्हा पिंपळाचं झाडं हे एखादं मंदिर, मोकळी जागा किंवा नदीच्या काठी उगवते तेव्हा ते अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचं झाड हे घरात असू नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आज आपण जाणून घेणार आहोत की, पिंपळाचं झाडं का तोडू नये? त्याचं धार्मिक महत्त्व काय आहे? याबद्दल माहिती.

पिंपळाचं झाडं तोडणं हे अशुभ मानलं जातं कारण धर्मशास्त्रानुसार पिंपळ हा एकमेव असा वृक्ष आहे, ज्या वृक्षाखाली ब्रह्मा, महेश आणि विष्णू या त्रीदेवांचा वास असतो. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास त्याला नियमितपणे जल अर्पण केल्यास या त्रिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहातो आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे धर्मशास्त्रानुसार पिंपळाचं झाड तोडणं अशुभ मानलं जातं, कारण पिंपळाचं झाड तोडल्यास पाप लागतं, आणि त्या पापाचं फळ हे आपल्याला पुढच्या जन्मात भोगावं लागतं अशी मान्यता आहे.

जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल, तर त्याने पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यास पिंपळाला नियमितपणे जल अर्पण केल्यास तसेच पिंपळाला दररोज प्रदक्षिणा घालून, झाडाजवळ दिवा लावल्यास पीतृदोष दूर होतो अशी मान्यता आहे. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला तोडणं अशुभ मानलं गेलं आहे. पिंपळाच्या झाडाचं विविध धार्मिक कार्यात देखील मोठं महत्त्व आहे. जसं की यज्ञामध्ये समिधा म्हणून पिंपळाच्या लकडाचा उपायोग होतो, पिंपळाच्या झाडाचे इतरही अनेक धार्मिक उपयोग आहेत, त्यामुळे पिंपळाचं झाड तोडणं अशुभ मानलं गेलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)