Vastu Shastra : मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाहीये? त्यांच्या करिअरची चिंता वाटतीये? मग करा हा सोपा उपाय

प्रत्येक पालकांची इच्छा असते आपल्या मुलांनी खूप अभ्यास करावा, शिकून मोठं व्हावं, त्यांना चांगल्या पदावर नोकरी मिळावी. परंतु अनेकदा मुल अभ्यासावर आपलं लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. त्यामुळे आई वडिलांची देखील चिंता वाढते, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे.

Vastu Shastra : मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाहीये? त्यांच्या करिअरची चिंता वाटतीये? मग करा हा सोपा उपाय
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 7:31 PM

प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते की, आपल्या मुलांनी खूप अभ्यास करावा, परीक्षेत चांगले मार्क मिळावे. डॉक्टर इंजिनीअर किंवा इतर कोणतीही चांगली पदवी मिळवावी. त्याचं करिअर उज्जवल असावं. परंतु अनेकदा होतं असं की मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. मुलं आपला अभ्यास रोजच्या रोज पूर्ण करत नाहीत. त्यांचं सर्व लक्ष हे खेळण्यामध्ये असतं. त्यामुळे हळुहळु त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत जातं, भविष्यात त्यांचं फार मोठं नुकसान होतं. मुलांना परीक्षेत कमी मार्क पडतात. त्यामुळे आई-वडिलांची देखील चिंता वाढते, आई-वडील मुलांचं अभ्यासात लक्ष लागावं, त्याला चांगले मार्क मिळावे यासाठी विविध उपाय करतात. वास्तुशास्त्रामध्ये देखील असेच काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल, आज आपण अशाच काही उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे, त्याबद्दल.

अनेक मुलांना टीव्ही पाहण्याची प्रचंड सवय असते, काही मुलं तर दिवसातील अनेक तास टीव्हीच पाहतात. तर काही मुलं हे तासंतास मोबाईलवर टाईमपास करतात. गेम खेळतात, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया साईटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे त्याचं लक्ष विचलीत होतं. परिणामी त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांना परीक्षेत देखील कमी मार्क पडतात. मात्र मुलांच्या या सवयींमुळे आई-वडिलांचं टेन्शन वाढतं. मुलांच्या या सवयी सुटाव्यात, तसेच त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं, यासाठी आज आपण एक उपाय पाहणार आहोत.

Loading...

वास्तुशास्त्रामध्ये पोपटाला हुशारीचं प्रतिक माण्यात आलं आहे. पोपट हा इतर पक्ष्यांपेक्षा हुशार पक्षी असतो. त्यामुळे घरात एक पोपटाचं मोठं पोस्टर लावावं असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. शक्यतो हे पोस्टर तुमची मुलं जिथे अभ्यास करतात, तिथे त्यांच्या रूमध्ये लावावं. तसेच या पोस्टरची दिशा ही उत्तर असावी, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. यामुळे मुलांचं अभ्यासात मन लागण्यास मदत होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us