घरात कोणत्या मूर्ती कधीही ठेवू नयेत; ज्यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते

काहीजणांच्या घरातील इंटेरिअर हे फार सुंदर आणि आकर्षक असतं. पण त्यात वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार घरात काही वस्तू किंवा पेंटींग्ज लावणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात कोणत्या मूर्ती किंवा पेंटींगज् कधीही ठेवू नयेत त्याबद्दल जाणून घेऊयात. 

घरात कोणत्या मूर्ती कधीही ठेवू नयेत; ज्यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते
Vastu Tips, Avoid placing these 5 idols and pictures for a positive home environment
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2025 | 3:59 PM

काहीजणांच्या घरातील इंटेरिअर हे फार सुंदर आणि आकर्षक असतं. पण त्यात वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार काही गोष्टी चुकीच्याही असू शकतात. जसं की आपण पाहिलं असेल की अनेकांच्या घरात खूप सारी पेटींगज् असतात, विविध प्रकारच्या मूर्ती असतात. पण काही वेळेला घरात अशापद्धतीचे मूर्ती ठेवणे किंवा विविध पेंटींगज् लावणे अशुभ परिणाम देणारे असतात.

चला जाणून घेऊयात की असे कोणते पेंटींग किंवा मूर्ती

असे म्हटले जाते की या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात आणि कौटुंबिक वातावरणावर परिणाम करतात. म्हणून, कोणत्या मूर्ती आणि चित्रे लावणे टाळले पाहिजे हे जाणून घेणे गरजेचे असते. चला जाणून घेऊयात की असे कोणते पेंटींग किंवा मूर्ती आहेत ज्या घरात कधीही ठेवू नयेत अन्यथा घरातील वातावरणावरू नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

घरात या मूर्ती किंवा पेंटींगज् कधीही ठेवू नयेत

बुडणाऱ्या बोटीचे चित्र: पहिले म्हणजे, बुडणाऱ्या बोटीचे चित्र घरात कधीही लावू नये. ही प्रतिमा जीवनातील अडथळे, नुकसान आणि अडचणींचे प्रतीक मानली जाते. असे मानले जाते की यामुळे घरात आर्थिक संकट आणि अशांतता निर्माण होऊ शकते.

नटराजाची मूर्ती: त्याचप्रमाणे, घरात नटराजाची मूर्ती ठेवणे किंवा चित्र लावणे देखील टाळावे. कारण त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद आणि कलह निर्माण होऊ शकतो.त्याऐवजी तुम्ही गौतम बुद्धांची ध्यानास्त असलेली मूर्ती ठेवू शकता. ज्यामुळे घरात शांत वाताल

सिंह, गिधाड, गरुड:  खूप मोठ्या किंवा भयावह मूर्ती देखील घरासाठी अशुभ मानल्या जातात. अशा मूर्ती जड आणि अस्थिर वातावरण निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार, सिंह, गिधाड, गरुड किंवा घुबड यांसारख्या भक्षक प्राण्यांची चित्रे घरात लावू नयेत. यामुळे राग, चिडचिड आणि तणाव वाढू शकतो, ज्यामुळे नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो.

घरात देवतांच्या शांत : याउलट, घरात देवतांच्या शांत आणि सौम्य प्रतिमा ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, गणेश किंवा देवी सरस्वती यांच्या मूर्ती घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. याव्यतिरिक्त, सूर्योदय, वाहते पाणी, हिरवीगार झाडे, वनस्पती आणि फुले यासारख्या नैसर्गिक दृश्यांची चित्रे आल्हाददायक आणि शांत वातावरण तयार करण्यास मदत करतात.

म्हणून, तुमचे घर सजवण्यासाठी शिल्पे किंवा चित्रे निवडताना, त्यांचा तुमच्या जीवनावर आणि घरातील वातावरणावर होणारा परिणाम नेहमी विचारात घेतला पाहिजे. कारण वस्तूंची योग्य निवड तुमच्या घराचे सौंदर्यच नाही तर घरातील सकारात्मकता आणि शांती देखील राखते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)