Vastu Tips: घरात पिंपळाचे झाड उगविणे शुभ की अशुभ? वास्तूशास्त्र काय सांगते?

| Updated on: Feb 03, 2023 | 6:13 PM

पीपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्ती आणि समृद्धी मिळते. वास्तुशास्त्रातही पिंपळाचे झाड खूप शुभ मानले जाते..

Vastu Tips: घरात पिंपळाचे झाड उगविणे शुभ की अशुभ? वास्तूशास्त्र काय सांगते?
पिंपळाचे झाड
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, हिंदू धर्मात पिंपळाचे झाड (Pipal tree) अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. हे सर्वोत्कृष्ट वृक्ष मानले जाते, धार्मिक मान्यतेनुसार पीपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्ती आणि समृद्धी मिळते. वास्तुशास्त्रातही पिंपळाचे झाड खूप शुभ मानले जाते, परंतु घरात पिंपळाचे झाड किंवा रोप वाढवणे अशुभ आहे. जर हे झाड घराच्या कानाकोपऱ्यात वाढत असेल तर याचा अर्थ घरावर वास्तु दोषांचा प्रभाव पडतो. जर तुमच्या घरातही हे झाड वाढत असेल तर त्यावर ज्योतिषशास्त्रात उपाय सांगितले आहेत.

घरात या झाडाची वाढ अशुभ आहे

पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, कारण पिंपळाच्या झाडामध्ये देवता वास करतात, परंतु घरात पिंपळाचे झाड असणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. म्हणूनच पिंपळाचे झाड घरात वाढू देऊ नये आणि ते वाढले तर ते काढून टाकावे.

हे उपाय करा

घरात पिंपळाचे झाड असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नाही आणि त्यामुळे रोज नवनवीन समस्या निर्माण होतात. पिंपळाचे झाड तोडू नये, तसे करणे अशुभ मानले जाते, जर एखाद्या विशेष स्थितीत ते कापायचे असेल तर त्याची पूजा करून फक्त रविवारीच कापावे आणि इतर कोणत्याही दिवशी तोडू नये.

हे सुद्धा वाचा

पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत.

वास्तुशास्त्रात पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदोष दूर होतो. यासोबतच सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)