Vastu Tips : कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी हे मसाले मदत करतील

| Updated on: Jul 31, 2021 | 10:06 AM

मसाले जेवणाची चव दुप्पट करतात. या मसाल्यांमुळेच जगात भारतातील जेवण प्रसिद्ध आहे. पण काय तुम्हाला माहित आहे की, चव वाढवण्याबरोबरच वास्तूनुसार मसाले देखील खूप फायदेशीर आहेत. या मसाल्यांशी संबंधित काही उपाय केल्याने ग्रहांचे दोष दूर करुन नशीब बदलता येते. या मसाल्यांबद्दल जाणून घेऊया

Vastu Tips : कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी हे मसाले मदत करतील
spices
Follow us on

मुंबई : भारतात मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या मसाल्यांची स्वतःची वेगळी चव असते. हे मसाले जेवणाची चव दुप्पट करतात. या मसाल्यांमुळेच जगात भारतातील जेवण प्रसिद्ध आहे. पण काय तुम्हाला माहित आहे की, चव वाढवण्याबरोबरच वास्तूनुसार मसाले देखील खूप फायदेशीर आहेत. या मसाल्यांशी संबंधित काही उपाय केल्याने ग्रहांचे दोष दूर करुन नशीब बदलता येते. या मसाल्यांबद्दल जाणून घेऊया (Vastu Tips These Kitchen Spices Can Help You To Get Rid From Vastu Dosh) –

जिरे –

जर कुंडलीत राहू-केतू ग्रह अस्वस्थ असतील तर समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या जीवनात राहू-केतूची वाईट स्थिती आहे, त्यांनी शनिवारी जिरे दान करावे. जीऱ्याचा संबंध राहू-केतू ग्रहाशी आहे.

लवंग आणि काळी मिरी –

लवंग आणि काळी मिरी शनि ग्रहाशी संबंधित आहेत. याचा वापर करुन तुम्ही कुंडलीतील शनि ग्रहाला बळकट करु शकता. यासाठी मोहरीच्या तेलात लवंग किंवा काळी मिरी घाला आणि शनिवारी दिवा लावा. यामुळे शनि ग्रहाच्या दुष्परिणामांपासून सुटका होईल.

हिंग –

हिंगचा संबंध हा बुद्ध आणि बृहस्पतिशी असल्याचे मानले जाते. दिवसाला जेवणात हिंग खाल्ल्याने मन शांत राहते. यासह बुद्ध दोषातून मुक्त होण्यास मदत होते.

बडीशेप –

बडीशेप शुक्र आणि मंगळाशी संबंधित आहे. वास्तुनुसार, बडीशेप आणि शुगर कँडी एकत्र खाल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो.

हळद –

हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी आहे असे मानले जाते. अशा स्थितीत, कुंडलीत बृहस्पतीला बळकट करण्यासाठी खिशात हळदीचा एक गाठ किंवा रुमालमध्ये एक चिमूटभर हळद ठेवा.

Vastu Tips These Kitchen Spices Can Help You To Get Rid From Vastu Dosh

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Door Vastu Tips : वास्तुनुसार घराचे दरवाजे बनवा, घरात सुख-शांती नांदेल, पैशांची कमतरता भासणार नाही

Vastu Tips | घरात हिरव्या रंगाचा वापर करा, सौभाग्य, विकास आणि आरोग्य लाभेल