AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : तुमच्याही घरात आहेत का ही 5 चित्रं? तर आजच काढून टाका, घरात सारखी भाडणं होतात, आर्थिक अडचणी येतात

आपल्या घरात ज्या काही वस्तू असतील, वनस्पती असतील किंवा आपण घरात लावलेले फोटो असील, त्या सर्वांचा आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशा पाच फोटोंची माहिती जाणून घेणार आहोत, जे घरात लावणं हे अत्यंत अशुभ माण्यात आलं आहे.

Vastushastra : तुमच्याही घरात आहेत का ही 5 चित्रं? तर आजच काढून टाका, घरात सारखी भाडणं होतात, आर्थिक अडचणी येतात
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 01, 2026 | 9:15 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? याबद्दल माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही चुकीची असेल तरच घरात वास्तुदोष निर्माण होतो असं नाही. तर तुम्ही तुमच्या घरात ज्या वस्तू ठेवतात, घरात जे फोटो लावतात, किंवा तुमच्या घरात जी झाडं असतात त्यांचा देखील तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. काही झाडं, फोटो घरात असणं हे अतिशय शुभ माण्यात येतं. परंतु त्यांची दिशा चुकली तर मात्र त्याचा विपरीत परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार असे काही फोटो आहेत, जे घरात लावणं हे अत्यंत अशुभ माण्यात आलं आहे. हे जर फोटो तुमच्या घरात असतील तर तुमच्या आयुष्यात अनेक संकट येऊ शकतात. तुमचं मन अस्वस्थ होतं, घरात काहीही कारण नसताना भाडणं होतात. एवढंच नाही तर तुमचं घर आर्थिक दृष्टया अस्थिर बनतं. आज आपण अशाच काही झाडांची माहिती जाणून घेणार आहोत.

रडणाऱ्या लहान मुलाचा फोटो – घरात कधीही रडणाऱ्या लहान मुलाचं चित्र किंवा फोटो असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमचं मन अस्थिर होतं. तसेच घरात काहीही कारण नसताना वाद विवाद वाढतात, ज्याच्या परिणाम हा तुमच्या मुलांवर देखील होऊ शकतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे,

गंभीर चेहरे असलेली माणसं – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात जे फोटो किंवा चित्र लावतात, त्यामध्ये व्यक्तींचे चेहरे हे कधीही गंभीर असू नयेत. नेहमी हसऱ्या चेहऱ्यांचेच फोटो घरात लावावेत. जर तुम्ही गंभीर चेहरे असलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावले तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

काटेरी वनस्पतींचे चित्र – घरात कधीही काटेरी वनस्पतींचे चित्र असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर घरात काटेरी वनस्पतींचे फोटो असतील तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. अशा घरात सतत भांडणं होत राहतात. पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येतो, त्यामुळे अशी चित्र जर घरात असतील तर ती घरातून काढून टाकण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

युद्ध – घरात कधीही युद्धाचा प्रसंग असलेले फोटो किंवा चित्र लावू नयेत, असा सल्ला वास्तुशास्त्रत देण्यात आला आहे. यामुळे घर अशांत आणि अस्थिर बनतं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

मावळता सूर्य – घरात नेहमी उगवत्या सूर्याचं चित्र असावं. घरात कधीही मावळत्या सूर्याचं चित्र असू नये. यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच