Vat Savitri Date 2023 : या दिवशी ठेवले जाणार वट सावित्रीचे व्रत, मुहूर्त आणि पुजा विधी

वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे.

Vat Savitri Date 2023 : या दिवशी ठेवले जाणार वट सावित्रीचे व्रत, मुहूर्त आणि पुजा विधी
वट सावित्री
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 24, 2023 | 9:35 PM

मुंबई : दरवर्षी ठेवलेल्या वट सावित्री वटला हिंदू धर्मात खूप मान्यता आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीसाठी उपवास करतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हा उत्सव दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पोर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी 3 जुनला हे व्रत करण्यात येणार आहे. तथापि, देशाच्या काही भागांमध्ये ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी वट सावित्री व्रत (Vat Savitri 2023) देखील पाळले जाते. त्यानुसार ही तारीख 19 मे रोजी येत आहे.

वट सावित्री व्रत 2023 तारीख

यावर्षी वट सावित्री व्रत 3 जुन 2023 रोजी होणार आहे. पंजाब, दिल्ली, ओडिशा, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये वट सावित्री व्रत या 19 मे  म्हणजेच अमावस्येला पाळले जाते. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या वेळी 3 जून रोजी येणाऱ्या ज्येष्ठ पौर्णिमेला हे व्रत केले जाणार आहे.

वट सावित्री व्रत 2023 अमावस्या मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी वट सावित्री व्रताचा शुभ मुहूर्त 3 जुन 2023 रोजी सकाळी 11.17 मी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.11 पर्यंत असेल. तथापि, उदयतिथीनुसार हे व्रत 3 जुन रोजीच पाळणे योग्य ठरेल.

वटवृक्षाच्या पूजे मागचे धार्मिक महत्व

वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान प्राप्ती साठी देखील अनेक स्त्रियां वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे लांब असते. ज्येष्ठ महिन्यातील अमावस तिथीला वट वृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुर्नजीवन मिळवून दिले होते. यादिवसापासून वट वृक्षाची पूजा केली जाऊ लागली. पिंपळाच्या झाडाला विष्णु देवाचे प्रतीक मानले जाते. तसंच वटवृक्षाला शिव शंकराचं प्रतीक मानलं जातं. यावृक्षाची पूजा करणं शंकराची पूजा करण्यासारखं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)