AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जे लोक स्वत:ला राजा मानायचे ते आज…, ‘ मोदी यांची काँग्रेसवर नाव न घेता जहरी टीका

पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. याआधी बुधवारी लोकसभेत विरोधी पक्षाने मोठा गोंधळ केल्याने मोदी यांचे भाषण झाले नाही.लोकसभेने आभार प्रदर्शन प्रस्ताव उत्तराविनाच पारित केला. लोकसभा अध्यक्षांनी यावेळी विरोधी पक्षाची वागणूकही काळा डाग असल्याचे म्हटले.

'जे लोक स्वत:ला राजा मानायचे ते आज..., ' मोदी यांची काँग्रेसवर नाव न घेता जहरी टीका
pm modi
| Updated on: Feb 05, 2026 | 9:47 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर चर्चेला उत्तर देताना काँग्रेससह विरोधी पक्षला झोडून काढले. काँग्रेसच्या सरकारने लक्ष न दिल्याने देश मागे पडला होता. देशासमोर अनेक आव्हाने आहेत. नवी जागतिकी समीकरणे तयार होत आहेत. नव्या जागतिक स्थितीत भारताकडे लोक झुकले आहेत. महिलांचा आणि तरुणांचा विकास आपले ध्यैय आहे. विरोधी पक्षाने यावेळी राज्यसभेत मोदी यांच्या भाषणात आधी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षाला टार्गेट करताना म्हणाले की जे लोक स्वत:ला राजा मानायचे. ते लोक आता आर्थिक असमानतेवर बोलत आहेत. घुसखोरांचे वकीलपत्र घेणाऱ्यांना तरुण कसे माफ करतील. घुसखोर त्यांचा स्वांतत्र्य हिसकावत आहेत. त्यांची रोजी रोठीचा हक्क हिसकावत आहेत. अशा लोकांसाठी हे लोक कवच बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की यांनी असे काम केले की जी योजना ९०० कोटींची होती तरी ९० हजार कोटींची झाली.

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “जगातील प्रमुख देश आज भारतासोबत व्यापारासाठी भागीदारी करण्यास उत्सुक आहेत. युरोपियन युनियन (EU) सोबतचा व्यापार करार असो किंवा अमेरिकेसोबतचा अलीकडील व्यापार करार असो.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “संपूर्ण जग आपल्या व्यापार करारांचे उघडपणे स्वागत करीत आहे. जेव्हा युरोपियन युनियनसोबत व्यापार करार झाला,त्यामुळे स्थिरतेवरील जागतिक विश्वास बळकट झाला. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर जागतिक विश्वास आणखी वाढला आहे. पूर्वी स्थिरतेची भावना होती तिच्यासोबत आता गतीची भावना देखील एकत्र मिळाली आहे.

बँकांचा एनपीएचा भार कमी केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने बँकांमधील एनपीएचा डोंगर कमी केला आहे आणि तो १ टक्क्यांपेक्षा कमी या विक्रमी नीचांकी पातळीवर आणला आहे. विरोधक अर्बन नक्षलवाद्यांप्रमाणे सार्वजनिक उपक्रमांबद्दल(पीएसयू) लोकांना दिशाभूल करायचे.पूर्वी असे मानले जात होते की सार्वजनिक उपक्रमांचा एकमेव उद्देश तोटा सहन करणे हाच आहे. परंतु आज ते विक्रमी नफा कमावित आहेत. पंतप्रधान म्हणाले की पूर्वी असा समज होता की सार्वजनिक उपक्रम फक्त तोटा सहन करण्यासाठीच तयार केले जातात, परंतु आज, त्या समजुतीच्या विरुद्ध, सार्वजनिक उपक्रम विक्रमी नफा कमावत आहेत असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात.
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.