Vidur Niti: जीवनात व्हायचे असेल यशस्वी तर विदुर नीतीच्या या दहा नियमांचे करा पालन

| Updated on: Nov 13, 2022 | 2:43 PM

महाभारतात धृतराष्ट्राचे सावत्र भाऊ विदुर यांची नीती जगप्रसिद्ध आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी विदुर यांनी काही उपाय सांगितले आहे.

Vidur Niti: जीवनात व्हायचे असेल यशस्वी तर विदुर नीतीच्या या दहा नियमांचे करा पालन
विदुर
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, महात्मा विदुर (Vidur) हे दासीचे पुत्र होते. नात्यात ते धृतराष्ट्राचे सावत्र भाऊ होते. महाभारताच्या काळात त्यांनी लोकांना आपल्या नीतीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. विदुर हे कुशल राजकारणी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी सांगितलेली नीती  अंगीकारून जीवनात यश मिळवता येते. जीवन सुसह्य आणि यशस्वी होण्यासाठी त्यांनी अतिशय सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. ज्यामुळे जीवन जगणे आणि पुढे जाणे सोपे होते. विदुरचे यांची नीती (Vidur Niti) काय आहे जाणून घेऊया.

 

  1.  जे विश्वास ठेवण्यास पात्र नाहीत त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका, परंतु जे विश्वास ठेवण्यास पात्र आहेत त्यांच्यावर कधीही अविश्वास दाखवू नका.
  2.  वासना, क्रोध, लोभ, हे तिन्ही नरकाचे दरवाजे आहेत. हे तिघे आत्म्याचा नाश करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
  3. हे सुद्धा वाचा
  4.  जो चांगले कर्म करतो आणि वाईट कर्मांपासून दूर राहतो. त्याच्या आयुष्यात अडचणी कमी येतात.
  5. ज्याचा आदर केला जातो तेव्हा तो आनंदाने बहरून जात नाही. अनादर झाल्यावर राग येत नाही. अशा माणसाला ज्ञानी म्हणतात.
  6. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही पूर्ण विचार करणे महत्त्वाचे आहे. अर्धवट विचार केलेले काम अपूर्ण असते.
  7. कोणत्याही कामात पूर्ण यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ते काम मनापासून कराल.
  8. ज्याला मनावर ताबा ठेवता येत नाही तो कधीही यश मिळवू शकत नाही.
  9. ज्याच्या हेतूबद्दल तुम्हाला शंका आहे अशा कोणत्याही व्यक्तीला तुम्ही तुमचे पैसे कधीच देऊ नका. अशी व्यक्ती तुमच्या पैशांचा गैरवापर करते आणि तुम्हाला अडचणीतही आणू शकते.
  10. जो माणूस बलवान असतानाही क्षमा करू शकतो आणि गरीब असतानाही दान करू शकतो, त्याला स्वर्गात स्थान मिळते.
  11. तुमचे पैसे कधीही आळशी व्यक्तीच्या हाती देऊ नका. त्याच्या आळशीपणामुळे तो संपत्तीचा नाश करतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)