Wednesday Atro Tips | जर बुध ग्रह असेल कमकुवत तर बुधवारच्या दिवशी हे 6 उपाय करा

जर हा बुध कमकुवत किंवा दुर्बल झाला तर आनंद पाठ फिरवितो. जुगार आणि सट्टेबाजीचे व्यसन लागते, निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते, मुले अडचणीत येतात, घसा किंवा त्वचेचे आजार होण्याची शक्यता वाढते. कोणत्याही कामात मन लागत नाही आणि सर्वकाही डोळ्यादेखत उध्वस्त होऊ लागते

Wednesday Atro Tips | जर बुध ग्रह असेल कमकुवत तर बुधवारच्या दिवशी हे 6 उपाय करा
Wednesday Astro Tips
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 8:15 AM

मुंबई : बुध ग्रहांचा राजपुत्र मानला जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये बुध कन्या आणि मिथुन राशिचा स्वामी आहे आणि त्याचे तत्व पृथ्वी आहे. बुध हा बुद्धिमत्ता, एकाग्रता, वाणी, त्वचा, सौंदर्य आणि सुवासाचा घटक मानला जातो. असे म्हणतात की जर एखाद्याच्या जन्मकुंडलीमध्ये बुध योग्य असेल तर सर्व काही शुद्ध आहे. म्हणजे जर बुध शक्तिशाली असेल तर आयुष्यात सर्व काही ठीक राहते. परंतु जर हा बुध कमकुवत किंवा दुर्बल झाला तर आनंद पाठ फिरवितो. जुगार आणि सट्टेबाजीचे व्यसन लागते, निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते, मुले अडचणीत येतात, घसा किंवा त्वचेचे आजार होण्याची शक्यता वाढते. कोणत्याही कामात मन लागत नाही आणि सर्वकाही डोळ्यादेखत उध्वस्त होऊ लागते (Wednesday Astro Tips Upay To Make Budh Grah Strong ).

बुध बळकट करण्याचे सोपे मार्ग येथे जाणून घ्या. हे सहा उपाय बुधवारी केल्याने बुध मजबूत होतो आणि आपल्या समस्या सूटतात.

1. धर्मग्रंथात बुधला हलक्या स्वभावाचा, वक्तृत्व आणि हिरव्या रंगाचा दर्शविला गेला आहे. म्हणून, बुधवारी हिरव्या गोष्टी वापरल्या पाहिजेत. जर बुध कमकुवत असेल तर नेहमी हिरवा रुमाल आपल्याजवळ ठेवा. कोणत्याही गरजूंना हिरवी मूग दान करा.

2. गणपतीला बुधवारचे स्वामी मानले जाते. भगवान गणेश हे बुद्धी देणारे आणि शुभकारक आहेत. गणपतीला हिरव्या रंगाची दूब आवडते. जर तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर बुधवारी गणेशाला हिरवू दूब किंवा दुर्वा अर्पण करा. यामुळे आपला बुध मजबूत होईल आणि घरात आनंद येऊ लागतो. दर बुधवारी गणेशाला 21 दुर्वा अर्पण केल्यास चांगले परिणाम मिळतात.

3. बुध दोषांनी त्रस्त असलेल्या व्यक्तीने देवी दुर्गेची पूजा करावी आणि दररोज 5, 7, 11, 21 किंवा 108 वेळा “ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ” या मंत्राचा जप करावा.

4. बुध दोषातून त्रस्त झालेल्या व्यक्तीने शरीरावर सोन्याचे दागिने घातले पाहिजेत. तसेच, घराच्या पूर्व दिशेला लाल झेंडा ठेवला पाहिजे. यामुळे बुधाचे दुष्परिणाम कमी होतात.

5. असे म्हटले जाते की सर्वात लहान बोटात पन्ना धारण केल्याने बुधचा प्रभाव दूर होतो. ज्योतिषाशी सल्लामसलत केल्यानंतर आपण ते घालू शकता.

6. बुधवारी गायीला गवत खाऊ घालावे. शक्य असल्यास वर्षाच्या किंवा महिन्याच्या कोणत्याही एका बुधवारी आपल्या वजनाइतके गवत किंवा चारा विकत घ्यावा आणि तो एखाद्या गोठ्यात दान करा. याशिवाय बुधवारी गणपतीला सिंदूर अर्पण करा.

Wednesday Astro Tips Upay To Make Budh Grah Strong

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Ji Puja Tips | मंगळवारच्या दिवशी महाबली हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा, पूर्ण होतील सर्व मनोकामना

Thursday Astro Tips | कुंडलीत गुरु दोष असेल तर गुरुवारी हे उपाय करा