
संत प्रेमानंद महाराज हे आपल्या साध्या आणि सोप्या प्रवचनांसाठी देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचं दर्शन घेण्यासाठी प्रवचन ऐकण्यासाठी भक्त कायमच गर्दी करत असतात. प्रेमानंद महाराज भक्ती, मानवता, दया आणि संयम या चार गोष्टींना मानवी जीवनाचा आधार मानतात, आणि याच गोष्टी ते आपल्या प्रवचनामध्ये देखील वारंवार सांगत असतात. त्यांनी आपल्या एका प्रवचनामध्ये बोलताना जगातील तीन सर्वात मोठी पापं कोणती आहेत, त्याबद्दल माहिती दिली आहे, तसेच या पापांपासून दूर राहाण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात प्रेमानंद महाराज यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
दारूपासून दूर रहा
प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनामध्ये म्हटलं आहे की, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती करायची आहे, जगात एक सन्मानाचं स्थान निर्माण करायचं आहे तर तुम्ही दारूपासून दूर राहिलं पाहिजे, दारूच सेवन हे एक मोठं पाप आहे. दारू ही अशी गोष्ट आहे ती माणसाच्या बुद्धीला भ्रष्ट करते. जेव्हा एखादा व्यक्ती दारू पितो तेव्हा तो आपला विवेक, सारासार विचार करण्याची शक्ती गमावून बसतो. दारू ही केवळ व्यक्तीच्या आरोग्यासाठीच हानीकारक नाही, तर दारूमुळे संपूर्ण समजाचं नुकसान होतं. दारूच्या नशेमध्ये तुम्ही अनेकदा असे काही कृत्य करतात, ज्याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर करावा लागतो, त्यामुळे व्यक्तीने कायम दारूपासून दूर राहिलं पाहिजे, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
मांसाहार
प्रेमानंद महाराज पुढे आपल्या प्रवचनामध्ये म्हणतात की आपल्या भुकेसाठी एखाद्या प्राण्याचा जीव घेणं हे महापातक आहे. शरीराला शक्ती देण्यासाठी मांसाहारच करावा असं काही नाही, शाकाहारातून देखील आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही प्राण्याचा बळी घेण्याचा अधिकार आपल्याला नाही.
स्त्री
प्रेमानंद महाराज म्हणतात माणसानं नेहमी आपल्या पत्नीसोबत प्रामाणिक राहावं, इतर महिलांबाबत कधीही चुकीचा विचार करू नये, आपण आपल्या घरात जसं आपली आई, आपली बहीण यांचा सन्मान करतो, तसाच सन्मान हा जगातील प्रत्येक स्त्रीचा केला पाहिजे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)