
हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीशी संबंधित काही विशेष नियम बनवण्यात आले आहेत. नखे कापण्याचे काही खास नियम आहेत. बऱ्याचदा वडीलधारी लोक रात्री किंवा काही खास दिवशी नखे कापण्यास मनाई करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री कधीही नखे कापू नयेत. असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी कोपते. चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी चुकूनही नखे कापू नयेत आणि कोणत्या दिवशी नखे कापणे शुभ मनले जाते.
या दिवशी चुकूनही नखे कापू नयेत
मंगळवार: ज्योतिषशास्त्रात मंगळवारी नखे कापणे निषिद्ध आहे. मंगळवारी नखे कापल्याने कर्ज वाढते आणि आर्थिक स्थिती बिघडते असे मानले जाते. विशेषतः जे लोक हनुमानांचा उपवास करतात, त्यांनी या दिवशी नखे कापणे टाळावे.
गुरुवार: गुरुवारी नखे कापणे देखील निषिद्ध आहे. गुरुवारी नखे कापल्याने वैवाहिक संबंधांमध्ये कलह निर्माण होतो असे मानले जाते.
शनिवार: शनिवारी देखील नखे कापू नयेत. ज्या लोकांच्या कुंडलीत शनि ग्रह कमकुवत आहे, त्यांनी शनिवारी नखे कापल्यास त्यांना मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील निर्माण होते.
रविवार: तसेच रविवारी नखे कापल्याने प्रगतीत अडथळे येतात. यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि यशातही अडथळा येतो. रविवारी नखे कापल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे या दिवशीही नखे कापू नयेत.
या दिवशी नखे कापावीत
सोमवार: ज्योतिषशास्त्रात सोमवारी नखे कापणे चांगले मानले जाते. या दिवशी नखे कापल्याने तमोगुणातून मुक्तता मिळते असे मानले जाते. सोमवार हा भगवान शिव, चंद्र आणि मनाशी संबंधित आहे.
बुधवार: याशिवाय बुधवार हा दिवस देखील नखे कापण्यासाठीही शुभ मानला जातो. बुधवारी नखे कापल्याने आर्थिक लाभ होतो आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते. यामुळे व्यवसायात उत्पन्नही वाढते.
शुक्रवार: शुक्रवार हा नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी नखे कापल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात धन, समृद्धी आणि सौंदर्य वाढते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)