
आपल्याला झोपेमध्ये अनेकदा अशी स्वप्न पडतात, ज्या स्वप्नामुळे आपल्याला मोठा धक्का बसतो. काही स्वप्न ही आपल्याला आनंद देणारी असतात. तर काही स्वप्न आपल्याला अस्वस्थ करतात. त्यातीलच एक स्वप्न म्हणजे विमानाचा अपघात. कोणाला जर विमान अपघाताचं स्वप्न पडलं तर लोक अस्वस्थ होतात, घाबरून जातात. आपल्याला जे स्वप्न पडलं आहे, त्याचा नेमका अर्थ काय होतो? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. स्वप्न शास्त्रामध्ये अशा स्वप्नांचा देखील अर्थ सांगितला आहे, चला तर मग जाणून घेऊयात, जर तुम्हाला स्वप्नात विमान अपघात होताना दिसला तर त्याचा नेमका काय अर्थ होतो?
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात विमानाचा अपघात दिसणं याचे अनेक अर्थ असू शकतात.अशा स्वप्नांचे संकेत हे त्या व्यक्तीची वर्तमान स्थिती काय आहे? यावर अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे विमान अपघाताचं स्वप्न पडलं याचे संकेत हे पुढील प्रमाणे असू शकतात.
योजनांमध्ये यश न मिळणं – तुम्ही जर एखादी काही मोठी योजना तयार करत असाल आणि त्याचवेळी तुम्हाला जर असं स्वप्न पडलं तर त्याचा असाही संकेत असू शकतो की त्या योजनामध्ये कदाचित तुम्हाला यश मिळणार नाही, किंवा तुम्ही जी योजना आखली आहे, त्यात तुम्हाला काही अडीअडचणींचा सामना करावा लागू शकतो.
जीवनात अचानक मोठा बदल – स्वप्नात विमान अपघात दिसणं हे या गोष्टीचे देखील संकेत असू शकतात की लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तुम्ही जी अपेक्षा केली आहे, त्या अपेक्षेच्या विरोधात देखील हा बदल असू शकतो. तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे, या बदलाला समोर जाण्यासाठी तुम्ही तयार असावं, या संदर्भात देखील हे संकेत असू शकतात.
भावनात्मक बदल – तुम्ही जर एखाद्या गोष्टीमुळे प्रचंड तणावाखाली आहात, तुम्ही असुक्षित आहात अशी जाणीव तुम्हाला वारंवार होत असेल तेव्हा देखील तुम्हाला विमान अपघाताचं स्वप्न पडू शकतं.
नात्यात दुरावा – स्वप्नशास्त्रानुसार जर एखादं नातं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल आणि त्या नात्यामध्ये दुरावा येणार असेल तर असा दुरावा येण्यापूर्वी देखील तुम्हाला या प्रकारचे संकेत मिळू शकातात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)