
वृंदावन येथे राहणारे प्रेमानंद महाराज हे आपल्या प्रवचनामुळे देशभरात प्रसिद्ध आहेत, त्यांची प्रवचनं ऐकण्यासाठी त्यांच्याकडून अध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी देशभरातून भक्त वृंदावनात गर्दी करत असतात. प्रेमानंद महाराज हे आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या भक्तांना पडलेल्या प्रश्नांचं समाधान करतात. त्यांना अनेक भक्त प्रश्न विचारत असतात, आणि प्रेमानंद महाराज देखील तेवढ्याच प्रेमानं आपल्या भक्तांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर देत असतात. सध्या प्रेमानंद महाराज यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांना एका भक्तानं प्रश्न विचारला आहे की, महाराज नखं कापण्याची योग्य वेळ आणि वार कोणता?, प्रेमानंद महाराज यांनी या व्हिडीओमध्ये आपल्या भक्ताच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात प्रेमानंद महाराज यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
प्रेमानंद महाराज म्हणतात नख कापण्यासाठी आठवड्यातील दोनच दिवस योग्य असतात, त्याच दिवशी हे काम केलं पाहिजे, इतर वेळी केल्यास या व्यक्तीचं नुकसान होण्याची शक्यता असते. पुढे बोलताना प्रेमानंद महाराज म्हणतात प्रत्येक वार कोणत्या न कोणत्या देवी देवतांना सर्पित असतो, प्रत्येक वार हा एका विशिष्ट ऊर्जेशी संबंधित असतो, त्यामुळे योग्य कामे ही योग्य वारीच केली पाहिजेत. जसं की रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे, रविवारचा सबंध हा ऊर्जेशी असतो, त्यामुळे या दिवशी नखं कापू नयेत. तसेच सोमवार हा दिवस भगवान महादेव यांचा वार आहे, त्यामुळे या दिवशी नखं कापणं, दाढी करणं, कटिंग करणं अशा गोष्टी वर्ज्य मानल्या जातात.
प्रेमानंद महाराज म्हणतात बुध आणि शुक्र यांचा संबंध हा सौंदर्याशी असतो, त्यामुळे बुधवार आणि शुक्रवार या दोनच दिवशी नखे कापावीत तसेच तुम्हाला जर कटिंग किंवा दाढी करायची असेल तर त्यासाठी हे दोन दिवस उत्तम आहेत, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. इतर वारी रविवार, सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी या दिवशी नखे कापू नये असं ते म्हणतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)