
हिंदू धर्म हा अतिशय प्राचीन धर्म आहे, हिंदू धर्मामध्ये अनेक प्रथा परंपरा आहेत, त्या प्रत्येक परंपरेमागे एक निश्चित असं कारण आहे. आपण जो प्रत्येक सण साजरा करतो, त्यामागे एक कारण असतं. जसं की आपण मकर संक्रांत का साजरी करतो, कारण तेव्हा सूर्य हा उत्तरायणामध्ये प्रवेश करत असतो, मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होऊ लागते, या गोष्टीचं प्रतिक म्हणून आपण संक्रात साजरी करतो. आपण जे काही सण, उत्सव साजरे करतो, ज्या काही प्रथा परंपरेचं पालन करतो त्यामागे काही कथा असतात. अनेक प्रथा परंपरांबद्दल आपल्याला माहिती नसते, मात्र आपले पूर्वज त्याचं पालन करत आले आहेत, म्हणून आपण देखील या प्रथा परंपरांचं पालन करतो. मात्र काळाच्या ओघात आज आपण अनेक प्रथा परंपरांचं आपल्या सोईनुसार पालन करतो, नेमकं यावरच आता प्रेमानंद महाराज यांनी भाष्य केलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात नेमकं प्रेमानंद महाराज यांनी काय म्हटलं आहे त्याबद्दल?
प्रेमानंद महाराज म्हणतात लोक आता हवे तेव्हा आणि कशाही पद्धतीनं पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा पंरपरांचं पालन करताना दिसतात, मात्र हे योग्य नाही, त्या-त्या वेळीच सर्व गोष्टी व्हायला हव्यात, पुढे बोलताना प्रेमानंद महाराज म्हणतात आजकाल लोक उठसूट कधीही कटिंग करतात, दाढी करतात. एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, असंही काही पहात नाहीत, मात्र असं करणं चूक आहे, त्यामागे काही कारणं आहेत. जे लोक शिव उपासक आहेत, त्यांनी सोमवारी चुकूनही दाढी कटिंग करू नये, ज्या लोकांना वाटतं आपल्या मुलांची प्रगती व्हावी या लोकांनी सोमवारी ही कामं टाळावीत असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
शनिवार आणि मंगळवारी दाढी, कटिंग केल्यामुळे अकाल मृत्यू योग तयार होतो, त्यामुळे या दिवशी दाढी, कटिंग करू नये असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. तर बुधवार आणि शुक्रवार हे दोन दिवस कटिंग करण्यासाठी खूप शुभ दिवस आहेत, या दिवशी ही काम केल्यास घरात सुख, समृद्धी येते, शांती राहते, प्रगती होते असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)