नवीन बांधकामासाठी भूमी पूजन करायचं आहे? डिसेंबरमधील ‘या’ 5 तारखा आहेत अत्यंत शुभ
Neev Pujan Muhurat 2026: नवीन घरची पायाभरणी अर्थात भूमी पूजन तुम्हाला करायचं असेल तर येणाऱ्या डिसेंबर महिन्यात कोणत्या तारखा महत्त्वाच्या आहेत हे जाणून घ्या.

Neev Pujan Muhurat December 2026: घर बांधणे किंवा स्वतः एखादी वस्तू बंधने हे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही लोक आपल्या कुटुंबासाठी राहण्याचे ठिकाण उभारतात, तर काही जण मंदिर किंवा इतर प्रकारच्या वास्तू बांधतात. मात्र, हिंदू धर्मात कोणतेही नवीन बांधकाम सुरू करण्यापूर्वी ‘भूमी पूजन’ अर्थात आपण जिथे बांधकाम करणार आहोत त्या जमिनीची पूजा करतो. हे करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, शुभ मुहूर्तावर धरती माता, वास्तुपुरुष आणि भगवान गणेश यांची पूजा केल्याने बांधकाम कार्यातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते. ‘भूमीपूजन’ विधीदरम्यान, धरती मातेकडे बांधकामासाठी परवानगी मागितली जाते आणि खोदकामामुळे तिला होणाऱ्या त्रासाबद्दल तिची क्षमा मागितली जाते.
डिसेंबर २०२६ मध्ये कोणत्या आहेत शुभ तारखा?
जर तुम्ही डिसेंबर २०२६ मध्ये नवीन घर बांधण्याचा किंवा कोणत्याही इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे फारसा वेळ उरलेला नाही. कारण की, डिसेंबरच्या मध्यापासून ‘खरमास’ सुरू होतो. हिंदू मान्यतेनुसार, खरमासच्या काळात विवाह, गृहप्रवेश आणि भूमिपूजन यांसारखे शुभ विधी करणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे, खरमास सुरू होण्यापूर्वीच पायाभरणी आणि भूमिपूजनाचे विधी पूर्ण करून घेणे हिताचे ठरेल. डिसेंबर महिन्यात यासाठी केवळ काही मोजकेच शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. कोणते मुहूर्त आहेत हे जाणून घेऊयात.
डिसेंबर २०२६ मध्ये ‘भूमी पूजन’ करण्यासाठी शुभ दिवस!
‘पंचांग’ अर्थात हिंदू दिनदर्शिकेनुसार, डिसेंबर २०२६ मध्ये ३, ४, ६, ११ आणि १४ या तारखा पायाभरणी समारंभ किंवा भूमी पूजन करण्यासाठी शुभ मानले जातात. या दिवशी, अनुकूल नक्षत्र आणि शुभ कालखंड यांचा संयोग जुळून येत असताना हा विधी पार पाडता येईल.
भूमीपूजन करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!
भूमीपूजनासाठी शुभ मुहूर्त निश्चित करताना राहूकाळ आणि भद्राकडे विशेष लक्ष द्या. या अशुभ कालखंडांत विधी करणे टाळावे, असे मानले जाते. याशिवाय वास्तुशास्त्रातील समजुतींनुसार, जमिनीच्या उत्तरेकडील-पूर्वेकडील कोपऱ्यातून ज्याला ‘ईशान्य’ कोपरा असेही म्हणतात तिकडून खोदकामाला सुरुवात करणे शुभ मानले जाते. पायाभरणी समारंभापूर्वी भगवान गणेश, वास्तुपुरुष, नवग्रह आणि भूमिमाता यांची पूजा करावी. बांधकाम कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण व्हावे, या उद्देशाने ही पूजा केली जाते.
(Disclaimer: या अहवालात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही.)