
सहसा आपण पूजा करताना आपल्या कपाळावर टिळा किंवा गंध लावतो, परंतु आपण अनेकदा पाहिले आहे की अनेकजण विशेषत: पुजारी पूजा करताना त्यांच्या कपाळावर तसेच त्यांच्या तळहातांवर, छातीवर आणि गळ्यावर चंदन किंवा कुंकाचा टिळा असतो. टिळा किंवा गंध लावणे ही आपल्या सनातन धर्माची परंपरा आहे. हिंदू धर्मात टिळा लावणे खूप महत्वाचे मानले जाते. धार्मिक शास्त्रांनुसार, टिळा लावणे पवित्र आणि फायदेशीर मानले जाते. कपाळाव्यतिरिक्त, गळा, छाती आणि तळहातांवर टिळा का लावला जातो? त्याचे फायदे काय असतात हे जाणून घेऊयात.
गळ्यावर टिळा लावण्याचे महत्त्व आणि फायदे
गळ्यावर टिळा किंवा गंध लावणे खूप शुभ मानले जाते. आपले बोलणे घश्याशी संबंधित असते. अन्ननलिका देखील घश्यातून जाते. या सर्व महत्त्वाच्या भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घश्यावर म्हणजे गळ्यावर टिळा लावणं महत्त्वाचं मानलं जातं. अशी धार्मिक श्रद्धा आहे की घश्याचा संबंध हा मंगळाशी असतो. मंगळाला बळकटी देण्यासाठी गळ्यावर टिळा किंवा गंध लावला जातो. गळ्यावर टिळा लावल्याने तो भात शांत राहतो आणि वाणी गोड राहते. श्वासोच्छवासाची गती शांत होते आणि मंगळ बलवान होतो.
छातीवर टिळा लावण्याचे महत्त्व आणि फायदे
असे म्हटले जाते की देव छातीवर वास करतात. येथे टिळा किंवा गंध लावल्याने ग्रहांची स्थिती मजबूत होते. माणसाच्या मनातील भीती, क्रोध, इच्छा, अशांतता यासारख्या समस्या दूर राहतात. छातीवर टिळा लावल्याने मन शांत होते. मनात कोणताही द्वेष राहत नाही. देव हृदयात वास करतो. याचा अर्थ आपण देवाला टिळा लावो असा होतो.
तळहातांवर टिळक लावण्याचे महत्त्व आणि फायदे
हात शुक्र ग्रहाशी संबंधित असतात. तळहातावर टिळा लावल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो असं म्हटलं जातं. जर एखाद्या व्यक्तीचा शुक्र ग्रह कमकुवत असेल तर तो बळकट करण्यासाठी तळहातांवर टिळा लावावा असं म्हटलं जातं. याशिवाय, असे केल्याने हातांशी संबंधित कोणताही आजार होत नाही. हे शक्ती आणि धैर्याचे देखील प्रतीकही मानले जाते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)