आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात खास आरास! गाभारा आंब्याच्या सजावटीनं खुलला
अक्षय तृतीया निमित्त देवीला आंबा, केळी , कलिंगड या फळांची आरास घालण्यात आली. तसेच शिवकालीन दागिन्याची विशेष अलंकार पुजा देखील घालण्यात आली.
1 / 5

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात आज अक्षय तृतीया निमित्त आंबा, केळी , कलिंगड या फळांची आरास करण्यात आली. प्रसन्न वातावरणाने गाभारा फुलून गेला.
2 / 5

अक्षय तृतीया मंगळवारी आल्याने देशभरातून तुळजाभवानी देवी भक्तांनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी शुभ मुहूर्तावर देवीचे दर्शन घेता येत असल्याने भाविक आनंदी होते.
3 / 5

साडे तीन शुभ मुहूर्तपैकी आज एक शुभ मुहूर्त असल्याने तुळजाभवानी देवीला शिवकालीन दागिन्याची विशेष अलंकार पूजा घालण्यात आली.
4 / 5

गाभाऱ्यात आज अक्षय तृतीया निमित्त आंबा, केळी , कलिंगड या फळांची आरास करण्यात आली.
5 / 5

देवीला आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य राजे राजवाडे यांनी दिलेले पुरातन दागिने, माणिक, हिरे, पाचू असलेली मोत्याची माळ असे दागिने घालण्यात आले.
Follow Us