
Shubman Gill T20 WC 2026 : शुबमन गिलला आश्चर्यकारकरित्या टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप 2026 संघातून ड्रॉप करण्यात आलं. शुबमन गिलला आशिया कपच्या आधी उपकर्णधार बनवण्यात आलं होतं. आता तो टी 20 वर्ल्ड कप आधीच टीममधून OUT झालाय. शुबमन गिलला संघातून बाहेर केल्यानंतर भारतीय टीमचे माजी सिलेक्टर आणि ओपनर के. श्रीकांत खूप खुश आहेत. श्रीकांत यांच्या मते शुबमन गिलला टीममधून बाहेर करण्याचा निर्णय एकदम योग्य आहे. यासाठी ते निवड समिती सदस्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीकांत यांनी यापूर्वी सुद्धा शुबमन गिलला ओवररेटेड फलंदाज म्हटलय. या दरम्यान शुबमन गिलबद्दल अजून एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आलीय. गिलला ड्रॉप करण्याच्या निर्णयामागे हेड कोच गौतम गंभीर, अजित आगरकर नाही, तर टीम इंडियाचे 3 निवडकर्ते आहेत.
रिपोर्ट्सनुसार शुबमन गिलला टी 20 वर्ल्ड कप 2026 टीममधून बाहेर करण्यामागे तीन निवडकर्ते आहेत. शुबमन गिलच्या निवडीच्या मुद्यावर सिलेक्शन कमिटीमध्ये दोन गट पडले होते. तीन सिलेक्टर्सनी शुबमन गिलच्या निवडीला विरोध केला. अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना गिल टीममध्ये हवा होता. पाच सदस्यांच्या निवड समितीमध्ये तीन सिलेक्टर्स, जर कुठल्या खेळाडूच्या निवडीच्या विरोधात असतील, तर त्याची निवड होत नाही.
अलीकडेच हे दोघे टीम इंडियाच्या सिलेक्शन कमिटीवर आले
प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंह अलीकडेच टीम इंडियाच्या सिलेक्शन कमिटीवर आले आहेत. सोशल मीडियावर फॅन्स या दोघांना शुबमन गिलला टीम बाहेर करण्यासाठी जबाबदार मानत आहेत. हा निर्णय या दोघांनीच घेतला किंवा कसा या बद्दल पुष्टी झालेली नाही.
Happy to see the praise that @rpsingh bhai and @pragyanojha bhai are getting for their inputs in the selection process. I always feel having selectors who have an ear to the ground could help us uncover more domestic talents than we’ve managed to do off late. #T20WorldCup
— Priyank Panchal (@PKpanchal09) December 22, 2025
अन्यथा वनडे टीममधूनही पत्ता होईल कट
शुबमन गिलचा पंजाब टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. हा खेळाडू विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसेल. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजसाठी सुद्धा टीममध्ये असेल. गिलला लवकरात लवकर व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये फॉर्म सापडला पाहिजे, अन्यथा वनडे टीममधूनही त्याचा पत्ता कट होऊ शकतो.