AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Epstein Files: ‘दोघांनाही अल्पवयीन सुंदर मुली… ‘ डोनाल्ड ट्रम्प मोठ्या अडचणीत; मेलानिया-ट्रम्प यांचे डिलिट केलेले ते फोटो अखेर…आता काय होणार?

Melania Donald Trump: Epstein Files प्रकरणात अमेरिकेतून एक मोठी अपडेटसमोर येत आहे. याप्रकणात मेलिनिया आणि डोनाल्ड ट्रम्प हे अडचणीत आले आहेत. त्यांच्यासंबंधीत 16 फाईलबाबत अमेरिकेतील न्याय विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. डिलिट केलेल्या त्या फोटोविषयी काय घेतला निर्णय?

Epstein Files: 'दोघांनाही अल्पवयीन सुंदर मुली... ' डोनाल्ड ट्रम्प मोठ्या अडचणीत; मेलानिया-ट्रम्प यांचे डिलिट केलेले ते फोटो अखेर...आता काय होणार?
एपस्टीन फाईल्स, डोनाल्ड ट्रम्पImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Dec 23, 2025 | 11:52 AM
Share

Epstein Files Donald Trump: एपस्टीन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने(DOJ) लैंगिक शोषणातील आरोपी जेफ्री एपस्टीनशी संबंधित अनेक कागदपत्रं, फोटो, ई-मेल, अश्लील संदेश यासर्व इतर गोष्टी समोर आल्या आहेत. पण अजून संपूर्ण प्रकरणं समोर येण्यास काही दिवस लागू शकतात. त्यातच याप्रकरणात विरोधकांची फोटो आणि कागदपत्रं धडाधड समोर आली. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीच्या त्या 16 फाईल्स आणि फोटो लपवण्यात आले होते. त्यावरून मग अमेरिकेत डेमोक्रॅट्स विरोधी रिपब्लिकन असा सामना रंगला. जनतेने ते फोटो जाहीर करण्याचा धोशा लावला. त्यानंतर आता या डिलिट केलेल्या 16 फाईल्स आणि मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंबंधीतील फोटो अखेर न्याय विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. तर या प्रकरणातील पीडितांची ओळख समोर येणार नाही याची दक्षता घेतल्याचे न्याय विभागाने स्पष्ट केले.

सरकार ट्रम्प यांना वाचवण्याच्या प्रयत्नात

मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो हटवल्यावर डेमोक्रॅट नेत्यांनी सरकारवर त्यांना वाचवण्याचा गंभीर आरोप लावला. डिप्टी अटॉर्नी जनरल टॉड ब्लांश यांनी याप्रकरणाशी ट्रम्प यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. योग्य पद्धतीने चौकशी आणि तपास व्हावा यासाठी पीडितेच्या वकिलांनी काही फोटो हटवण्याची विनंती केल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संवेदनशील आणि अल्पवयीन मुलींची ओळख समोर येऊ नये यासाठी सर्व उपाय केल्याचा दावा न्याय विभागाने केला आहे. तर राजकीय अथवा प्रभावशाली व्यक्तीला याप्रकरणात वाचवण्याचा कुठलाही हेतू नसल्याचे न्याय विभागाने स्पष्ट केले.

शुक्रवारी 3 लाख नवीन दस्तावेज अपलोड

दरम्यान गेल्या शुक्रवारी न्याय विभागाने एपस्टीन प्रकरणाशी संबंधीत 3 लाख नवीन दस्तावेज अपलोड केली. यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन, राजपूत्र आणि इतर प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहेत. यातील काही जण हे तरुण आणि सुंदर मुलींसोबत चर्चा करताना दिसत आहेत. तर या यादीतून डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया आणि एपस्टीन यांचे फोटो हटवण्यात आले होते. तीव्र टीकेनंतर हे फोटो अपलडो करण्यात आले आहेत.

आम्हा दोघांना अल्पवयीन सुंदर मुली आवडतात

जेफ्री एपस्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ‘गहिरी’ दोस्ती असल्याचे समोर आलेले आहे. या दोघांची भेट अनेक पार्ट्यांमध्ये झालेली आहे. या दोघांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे अनेक फोटो समोर आलेले आहेत. त्यामुळे याविषयी ट्रम्प यांनी कितीही नकार घंटा वाजवली तर दोघांच्या मैत्रीचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर विरोधकांनी चांगलाच निशाणा धरला आहे.

एका मुलाखती दरम्यान ट्रम्प हे एपस्टीन यांच्याविषयी मनमोकळेपणे बोलले आहेत. 2002 मध्ये ट्रम्प यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला. त्यावरून अमेरिकेत वादळ उठलं आहे. “मी जेफ याला 15 वर्षांपासून ओळखतो. तो एकदम जबरदस्त माणूस आहे. आम्हा दोघांनाही अल्पवयीन सुंदर मुली आवडतात.” असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 1992 मध्ये ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील मार-ए-लागो रिसोर्टमध्ये एपस्टीन आणि चीयरलीडर्ससोबत पार्टी केली होती. 2019 मध्ये NBC ने त्याचे फुटेज समोर आणले होते.

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.