AB De Villiers : विराट कित्येक महिने माझ्याशी बोललाच नाही, एबी डिव्हिलियर्सचा खळबळजनक गौप्यस्फोट; काय बिनसलं ?

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने अलीकडेच विराट कोहलीबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. विराट कोहली बराच काळ त्याच्याशी बोलत नव्हता, असं त्याने नुकतचं सांगितलं. त्यामागे काय कारण होतं, दोघांचं वाजलं तरी का ? नेमकं झालं तरी काय ?

AB De Villiers : विराट कित्येक महिने माझ्याशी बोललाच नाही, एबी डिव्हिलियर्सचा खळबळजनक गौप्यस्फोट; काय बिनसलं ?
विराट कोहली - एबी डिव्हिलियर्स
Image Credit source: social media
| Updated on: Jun 16, 2025 | 9:21 AM

Virat Kohli And Ab De Villiers : भारताचा दिग्गजल खेळाडू विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स हे दोघे खूप चांगले मित्र मानले जातात. अनेकदा त्यांची मस्ती, त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 3 जूनला आरसीबीने आयपीएल 2025 ची फायनल मॅच जिंकल्यानंतर चाहत्यांना विराट आणि एबी डिव्हिलियर्सने गाढ मैत्री पुन्हा पहायला मिळाली. भर मैदानात विराटने एबी डिव्हिलियर्सला घट्ट मिठी मारली, दोघांचे सेलिब्रेशनही खूप व्हायरल झाला. मात्र याच एबी डिव्हिलियर्सने विराटबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ही काळापूर्वी दोघांच्या मैत्रीत फूट पडली होती, त्याचं वाजलं होतं आणि याचा खुलासा खुद्द एबी डिव्हिलियर्सनेच केला आहे.

विराट आणि एबी डिव्हिलियर्सचा वाद

एका मुलाखतीदरम्यान खुद्द डिव्हिलियर्सनेच याबाबतीत खुलासा केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या एका चुकीमुळे क्रिकेट स्टार विराट कोहली हा कित्येक महिने आपल्याशी बोललाच नाही असा गौप्यस्फोट डिव्हिलियर्सने केला. त्याने चुकून जेव्हा कोहलीच्या खासगी आयुष्याशी निगडीत एक गोष्ट सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर जाहीर केली तेव्हा विराट खूपच नाराज झाला होता, आणि दोघांच्या मैत्रीत फूट पडली होती. मात्र असं असलं तरी आता तो इश्यू सॉल्व्ह झाला असून विराट आणि डिव्हिलियर्स एकमेकांशी पुन्हा बोलू लागले आहेकत, त्यामुळे दक्षिण आफ्रिकन फलंदाजही रिलॅक्स झालाय.

नेमकं घडलं तरी काय ?

खरं तर, 2024 च्या सुरुवातीला, भारतात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक घेतला होता. कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे त्याचं दुसरं मूल एक्सपेक्ट करत आहेत, आणि त्यामुळेच कोहलीने मालिकेतून माघार घेतली असा दावा डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एका प्रश्नाचे उत्तर देताना केला होता. मात्र या विधानामुळे सोशल मीडियावर प्रचंड मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच डिव्हिलियर्सने त्याच्या विधानावर घूमजाव करत माफी मागितली होती आणि त्याने दिलेली माहिती चुकीची असल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र ही गोष्ट फार काळ लपून राहिली नाही आणि फेब्रुवारीमध्ये ती खरीही ठरली. 15 फेब्रुवारी रोजी अनुष्काने मुलगा अकायला जन्म दिला, विराटने सोशल मीडिया अकाऊटंवर चाहत्यांसोबत ही गूड न्यूज शेअर केली होती. पण डिव्हिलियर्सच्या या विधानामुळे त्यावेळी गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

काय म्हणाला डिव्हिलियर्स ?

डिव्हिलियर्सने अलीकडेच क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना या गोष्टीचा उल्लेख करत मठा खुलासा केला. त्या विधानानंतर नंतर कोहलीने अनेक महिने त्याच्याशी संपर्क साधला नाही. तो म्हणाला, ‘गेल्या सहा महिन्यांपासून मला कोहलीशी बोलण्याची संधी मिळाली आहे. देवाचे आभार मानतो ! कारण तो जेव्हा दुसऱ्या अपत्याची वाट पहातहोता, तेव्हा मी खूप मोठी चूक केली होती’ असं डिव्हिलियर्सने सांगितलं. तो बराच काळ माझ्याशी बोललाच नाही, अखेर गेल्या 6 महिन्यांपासून आम्ही पुन्हा बोलू लागलोय.

कोहलीने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, त्याविषयावरही त्याने आपल्याशी चर्चा केल्याचं डिव्हिलियर्सने सांगितलं. तो म्हणाला, ‘आम्ही याबद्दल बोललो. मीही अशाच परिस्थितीत होतो, कारण मी 2018 साली निवृत्त झालो होतो. विराटचा निर्णयही असाच काहीसा होता’ असं त्याने नमूद केलं.

विराट-अनुष्काची मुलं

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं लग्न 2017 साली झालं. त्यापूर्वी ते दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर 4 वर्षांनी 2021 साली त्यांना वामिका ही मुलगी झाली. तर 2024 साली अनुष्का-विराटला मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी अकाय ठेवलं. विराट आणि अनुष्का दोघेही त्यांच्या गोष्टी खाजगी ठेवू इच्छितात, म्हणून त्यांनी अद्याप त्यांच्या मुलांचे फोटो उघड केलेले नाहीत. फोटोग्राफर्सनाही मुलांचे फोटो काढण्यास त्यांनी मनाई केली आहे.