omicron : महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत नियमांचे काटेकोर पालन करा, आदित्य ठाकरेंचे आदेश

| Updated on: Dec 01, 2021 | 8:38 PM

ओमिक्रोन विषाणुने सध्या जगाला धडकी भरवली आहे. त्याला भारतालाही संभाव्य धोका आहे. त्याामुळे खबरदारी म्हणून सरकारकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमिक्रोनचा धोका महिला फुटबॉल संघालाही आहे. 

omicron : महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत नियमांचे काटेकोर पालन करा, आदित्य ठाकरेंचे आदेश
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
Follow us on

मुंबई : एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनद्वारे येत्या २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धेच्या तयारीचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आढावा घेतला. या स्पर्धेत आशिया खंडातील १२ देशांचे संघ सहभागी होत असून स्पर्धा कालावधीत कोविड नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश त्यांनी दिले.

महिला फुटबॉल संघाला ओमिक्रोनचा धोका

ओमिक्रोन विषाणुने सध्या जगाला धडकी भरवली आहे. त्याला भारतालाही संभाव्य धोका आहे. त्याामुळे खबरदारी म्हणून सरकारकडून काही उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमिक्रोनचा धोका महिला फुटबॉल संघालाही आहे. मुंबई फुटबॉल अरेना, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम आणि पुणे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत, त्यामुळे स्पर्धेचे आयोजन दर्जेदार व्हावे, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे, सर्व संबंधितांची नियमित तपासणी करावी, असे निर्देश श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले. स्पर्धा कालावधीत संबंधितांची राहण्याची सोय उत्तम असावी, त्यांचा प्रवास कमीत कमी व्हावा, सरावाची सुविधा, प्रसिद्धी आदी बाबींचाही आढावा घेऊन क्रीडांगण परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

स्पर्धेत अनेक परदेशी खेळाडू येणार

या स्पर्धेमध्ये 12 देशातील खेळाडुंचा सहभाग असल्याने ओमिक्रोनचा धोकाही तितकाच आहे, हे ओळखून या उपाययोजना करण्यात येत आहे. खेळाडुंच्या सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घेण्यास प्रधान्य दिलं जात आहे. त्याचसाठी आदित्य ठाकरेंनी ही बैठक घेतली होती.

Mamata Banerjee | राहुल गांधींच्या क्षमेतवर पुन्हा ममता बॅनर्जींचा सवाल

WhatsApp वरून तुमचे डीमॅट खाते उघडा आणि IPO साठी करा अर्ज, पण कसा?

ममता बॅनर्जींना काँग्रेस नेत्यांचं जोरदार प्रत्युत्तर; अशोक चव्हाण आणि थोरातांचा ममतांसह विरोधकांना मोलाचा सल्ला