Vaibhav Sooryavanshi : मैदानावर श्रीलंकन खेळाडूंना भिडल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये वैभव सूर्यवंशी कोणाच्या पाया पडला? VIDEO

SL A vs IND A : श्रीलंकन खेळाडूंसोबत वैभव सूर्यवंशीच्या वादावादीचे व्हिडिओ व्हायरल होत असतानाच त्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात वैभव सूर्यवंशी पाया पडताना दिसतो.

Vaibhav Sooryavanshi : मैदानावर श्रीलंकन खेळाडूंना भिडल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये वैभव सूर्यवंशी कोणाच्या पाया पडला? VIDEO
Vaibhav Sooryavanshi
| Updated on: Jun 16, 2026 | 9:07 AM

Vaibhav Sooryavanshi in Sri Lanka : श्रीलंका टूरवर भारतीय अ संघापेक्षा वैभव सूर्यवंशीची जास्त चर्चा आहे. यावेळी चर्चा वैभवच्या प्रदर्शनापेक्षा पण मैदानावरच्या वादावादीची जास्त आहे. काल 15 जूनला तिंरगी मालिकेत श्रीलंका अ विरुद्ध भारतीय अ संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला. हा सामना हरल्यानंतर वैभव सूर्यवंशीचं श्रीलंकन खेळाडूंसोबत जोरदार भांडणं झालं. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या वादावादीच्या व्हिडिओनंतर वैभव सूर्यवंशीचा चरण स्पर्श करुन आशिर्वाद घेतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. श्रीलंकेत वैभव सूर्यवंशीने कोणाचा आशिर्वाद घेतला.

समोर आलेला व्हिडिओ सामन्यानंतरचा आहे. वैभव सूर्यवंशी अनुरा टेनेकुन यांच्या पाया पडला. त्यांचे आशीर्वाद घेतले. अनुरा टेनेकुन श्रीलंकेचे पहिले वनडे कॅप्टन आहेत. 1975 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्यांनी श्रीलंकन टीमचं नेतृत्व केलं होतं. दांबुलामध्ये ते 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला भेटले. या भेटी दरम्यान वैभवने त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीत अनुरा टेनेकुन यांच्याकडून वैभवला एक सल्ला मिळाला. ‘लोक काय बोलतील याचा विचार नको करु तू. आपल्या खेळावर लक्ष दे’

श्रीलंकन प्लेयरने सुद्धा वैभवला धक्का दिला

अनुरा टेनेकुन यांना भेटण्याआधी वैभव सूर्यवंशीची ग्राऊंडवर श्रीलंक ए टीममधील खेळाडूंशी वादावादी झाली होती. सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने सामना गमावल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना हे भांडण झालं. श्रीलंकन खेळाडूंनी आधी वैभव सूर्यवंशीला काहीतरी म्हटलं. त्यावर वैभवने समोरच्या प्लेयरला धक्का दिला. श्रीलंकन प्लेयरने सुद्धा वैभवला धक्का दिला. दांबुलाच्या ग्राऊंडवर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

वैभवने किती धावा केल्या?

श्रीलंका ए विरुद्ध खेळताना काल वैभव सूर्यवंशीने 14 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने एक सिक्स आणि 3 फोर मारले. भारतीय अ संघाने 265 धावा केल्या. श्रीलंका अ संघाने सुद्धा 50 ओव्हरमध्ये तितक्याच धावा केल्या. सामना टाय झाला. त्यामुळे सुपर ओव्हर झाली. त्यात श्रीलंकने टीमने भारतावर 8 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 16 धावा केल्या. भारताला विजयासाठी 17 धावा करण्याची गरज होती. पण भारताचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे या दोघांना फक्त 9 धावाच करता आल्या.

Follow Us