AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat-Head Controversy : ‘तू गोलंदाजीला समोर ये, काही बॉल टाक’, चॅलेंज देणाऱ्या कोहलीला ट्रेविस हेडचं सोशल मिडिया पोस्टमधून उत्तर

Virat Kohli Travis Head Handshake Controversy : काल आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना झाला. ही मॅच हैदराबादने जिंकली. पण या मॅचपेक्षा विराट कोहली आणि ट्रेविड हेड यांच्या वादाची चर्चा रंगली आहे. चॅलेंज देणाऱ्या कोहलीला ट्रेविस हेडने सोशल मिडिया पोस्टमधून उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.

Virat-Head Controversy : 'तू गोलंदाजीला समोर ये, काही बॉल टाक', चॅलेंज देणाऱ्या कोहलीला ट्रेविस हेडचं सोशल मिडिया पोस्टमधून उत्तर
Virat Kohli Travis Head Handshake ControversyImage Credit source: PTI
| Updated on: May 23, 2026 | 1:19 PM
Share

IPL 2026 मध्ये काल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना झाला. ही मॅच हैदराबादने 55 धावांनी जिंकली. या मॅच नंतर जय-पराजयपेक्षा पण जास्त चर्चा विराट कोहली आणि ट्रेविस हेड यांच्यामधल्या भांडणाची आहे. मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये टशन, वादविवाद पहायला मिळाला. आता दोघांमधली ही लढाई सोशल मीडियावर सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर ट्रेविस हेडची मॅच नंतरची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मॅच संपल्यानंतर काही वेळातच ट्रेविस हेडने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला. हा फोटो गोलंदाजीच्यावेळेचा होता. फोटोच्या खाली लिहिलय की, ‘शरीराला संभ्रमावस्थेत राहू दे’. हेडने इन्स्टाग्रामवर ही स्टोरी पोस्ट करताच युजर्सनी याचा संबंध थेट विराट कोहली वादाशी जोडायला सुरुवात केली आहे. अनेक युजर्सचा दावा आहे की, हेडची ही पोस्ट विराट कोहली सोबत झालेल्या वादाचं उत्तर आहे.

‘शरीराला संभ्रमावस्थेत राहू दे’ ही जी ट्रेविस हेडची पोस्ट आहे ती, फिटनेस आणि जीमशी संबंधित टर्म आहे. शरीराला नवीन आव्हानं देणं हा त्या पोस्टचा अर्थ आहे. म्हणजे एकाच प्रकारची जीवनशैली, वेळापत्रकाची सवय होऊ नये. हेडच्या पोस्टचा संबंध फिटनेस, जीमशी असला, तर नवीन आव्हानं देणं असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. या मॅचमध्ये हेडने गोलंदाजी करुन विकेट घेतला. त्यानंतर ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.

‘तू गोलंदाजीला समोर ये, काही बॉल टाक’

इंटरेस्टिंग म्हणजे ट्रेविस हेड गोलंदाजी करत नाही. पण आरसीबी विरुद्ध त्याने चेंडू हातात घेतला व येताच परिणामही दाखवून दिला. हेडने RCB चा कॅप्टन रजत पाटीदारची विकेट काढली आणि फॅन्सला आश्चर्याचा धक्का दिला. मॅच दरम्यान विराट कोहली आणि ट्रेविस हेडमध्ये अनेकदा शाब्दीक वादावादी पहायला मिळाली. आरसीबी धावांचा पाठलाग करत असताना कोहली वारंवार हेडला गोलंदाजीसाठी चिथावणी देत होता. कॉमेंटटर्स नुसार कोहली मस्करीत पण आक्रमक अंदाजात हे सांगत होत. ‘तू गोलंदाजीला समोर ये, काही बॉल टाक’

Travis Head

खरा वाद मॅच संपल्यानंतर सुरु झाला

ट्रेविस हेडने यावरुन विराट कोहलीला उत्तर दिलं की, ‘मी गोलंदाजीला येण्याआधीच तू आऊट झालास’ खरा वाद मॅच संपल्यानंतर सुरु झाला. कोहलीने ट्रेविस हेडशी हस्तांदोलन करणं टाळलं. कोहलीने SRH चा कॅप्टन पॅट कमिन्ससह अन्य खेळाडूंना हात मिळवला. पण हेड सोबत काही इंटरॅक्शन झालं नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...