अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया त्याच्यापेक्षा वयाने आहे मोठी; पाहा किती आहे अंतर

अर्जुन तेंडुलकरचा 13 ऑगस्ट 2025 रोजी सानिया चांडोकशी साखरपुडा झाला. पण हे फार कमी जणांना माहित असेल की सानिया ही अर्जुनपेक्षा वयाने मोठी आहे. होय, जसं सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्याही वयात फरक आहे. अंजली या सचिनपेक्षा 5 वर्षांनी मोठ्या आहेत ती गोष्ट योगायोगाने अर्जुनच्याबाबतीतही घडली आहे. सानिया ही अर्जुनपेक्षा वयाने किती मोठी आहे जाणून घेऊयात.

अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया त्याच्यापेक्षा वयाने आहे मोठी; पाहा किती आहे अंतर
arjun tendulkar and saniya chandok
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 15, 2025 | 12:56 PM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे लग्न ठरलं आहे . मुंबईतील उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी त्याचा 13 ऑगस्ट 2025 रोजी साखरपुडाही झाला समारंभाचे फोटोही समोर आले आहेत. अर्जुनची होणारी पत्नी सानिया ही अर्जुन तेंडुलकरची बालपणीची मैत्रीण आहे. सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. तिने व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास केला आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर, तिने मुंबईत प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोर मिस्टर पॉजची स्थापना केली. पण अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुडा ठरल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

मुलाच्याबाबतही योगायोगाने हीच गोष्ट घडली आहे

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने क्रिकेट जगतात वडिलांसारखीच ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधला देव म्हटले जाते. क्रिकेटसोबतच सचिनचे वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं आहे. सर्वांनाच हे माहित आहे की सचिन तेंडुलकरने अंजली तेंडुलकरशी लग्न केले तेव्हा अंजली सचिनपेक्षा 5 वर्षांनी मोठी होती आणि आता मुलाच्याबाबतही योगायोगाने हीच गोष्ट घडून आली आहे. कारण अर्जुन तेंडुलकरची भावी पत्नी सानिया चांडोक देखील त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे.


सानिया चांडोक अर्जुनपेक्षा वयाने मोठी 

अर्जुन तेंडुलकरचा जन्म 24 सप्टेंबर 1999 रोजी झाला आणि तो सध्या 25 वर्षांचा आहे, तर सानिया चांडोकचा जन्म 23 जून 1998 रोजी झाला आहे. म्हणजेच अर्जुन आणि सानियाच्या वयात एक वर्षापेक्षा जास्त फरक आहे. सानिया अर्जुनपेक्षा मोठी आहे.

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्यात 5 वर्षांचा फरक

सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला आणि सध्या सचिन 52 वर्षांचा आहे तर त्याची पत्नी अंजली तेंडुलकरचा जन्म 10 नोव्हेंबर 1967 रोजी झाला आणि दोघांमध्ये 5 ते 6 वर्षांचं अंतर आहे. सचिन तेंडुलकरने 24 मे 1995 रोजी अंजलीशी लग्न केले होते आणि त्यावेळी तो 22 वर्षांचा होता तर त्याची पत्नी अंजली लग्नाच्या वेळी 27 वर्षांची होती. दरम्यान अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाल्यानंतर आता त्यांचं लग्न कधी होणार याबाबत चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे.