पाकिस्तानचा कर्णधार Babar Azam म्हणतो “हा एक क्षण पराभवासाठी जबाबदार…”

| Updated on: Nov 14, 2022 | 8:00 AM

कालच्या सामन्यात पाकिस्तानचा महत्त्वाचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रीदी हा झेल घेत असताना जखमी झाला.

पाकिस्तानचा कर्णधार Babar Azam म्हणतो हा एक क्षण पराभवासाठी जबाबदार...
Babar Azam
Follow us on

मुंबई : पाकिस्तान टीमचा (Pakistan Team)फायनल मॅचमध्ये पराभव झाल्यापासून खेळाडूंवर चौफेर टीकास्त्र सुरु झालं आहे. इंग्लंडच्या (England) खेळाडूंनी चांगली खेळी केल्यामुळे पाकिस्तान टीमचा पराभव झाला. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड टीमच्या प्रत्येक खेळाडूने चांगली खेळी केली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या टीमने कालचा सामना एकहाती जिंकला. विशेष म्हणजे पाकिस्तानच्याविरुद्ध अंतिम सामन्यात (World Cup Final 2022) इंग्लंडने पाच गडी राखून विजय मिळविला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली, त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठे फटके मारता आले नाहीत.

कालच्या सामन्यात पाकिस्तानचा महत्त्वाचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रीदी हा झेल घेत असताना जखमी झाला. ज्यावेळी त्याला गोलंदाजी करण्यासाठी सांगण्यात आले, त्यावेळी त्याने फक्त एक बॉल टाकला आणि तो थांबला. त्याचे उरलेले 5 चेंडू इफ्तिखार अहमद याने टाकले. तो तंदुरुस्त असता तर कालच्या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता असं बाबर आझमने पत्रकार परिषदेत सांगितलं.

कालच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, त्याचबरोबर फलंदाजांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंड टीम विश्वविजेता ठरली. शाहीन आफ्रीदी जखमी झाला नसता, कालच्या मॅचचा निकाल तुम्हाला वेगळा पाहायला मिळाला असता. विशेष म्हणजे कालच्या मॅचमध्ये आम्ही परिस्थिती पाहू खेळ केला आहे असंही बाबर म्हणाला.

हे सुद्धा वाचा

शाहीन आफ्रिदी जखमी झाल्यावर ज्यावेळी मैदानाबाहेर गेला. तेव्हा इंग्लंड टीमला 4.5 ओव्हरमध्ये 41 धावांची गरज होती. त्यावेळी सामना रोमांचक होईल असं वाटतं होतं. शाहीनची ओव्हर पुर्ण करण्यासाठी आलेल्या इफ्तिखार अहमदने 13 धावा दिल्या. त्या पाच बॉलमध्ये बेन स्टोक्सने षटकार आणि चौकार मारला. त्यावेळी मॅच पुर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकली.