IPL 2026 : हनीट्रॅप, लैंगिक शोषण..खेळाडूंच्या रुममध्ये..अखेर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला

IPL 2026 : आयपीएल 2026 चा सीजन रंगात आलेला असताना बीसीसीआयने एक कठोर निर्णय घेतला आहे. त्यामागे तशी कारणं सुद्धा आहेत. बीसीसीआयला असा निर्णय घ्यावा लागला. त्या मागची पार्श्वभूमी काय आहे?.

IPL 2026 : हनीट्रॅप, लैंगिक शोषण..खेळाडूंच्या रुममध्ये..अखेर बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला
honey trap
| Updated on: May 08, 2026 | 10:55 AM

इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2026 चा सीजन सुरु आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयने सर्व फ्रेंचायजींसाठी नवीन आणि कठोर एडवायजरी जारी केली आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षितता ध्यानात घेऊन हॉटेलमध्ये येणारे-जाणारे पाहुणे आणि विजिटर्ससाठी कठोर नियम लागू केले आहेत. BCCI सचिव देवजीत सैकिया यांनी फ्रेंचायजीना अधिकृत संदेश पाठवला आहे. एडवायजरीच कठोरतेने पालन होतय की नाही याची आयपीएल ऑपरेशन्स टीम वेळोवेळी तपासणी करेल असं सैकिया म्हणाले. टीम मॅनेजर्सना सर्व स्वीकृत गेस्ट विजिट आणि हॉटेल मूवमेंटचा रेकॉर्ड ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काही प्रकरणात टीम मॅनेजर्सच्या माहितीशिवाय आणि परवानगीशिवाय बाहेरच लोक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या हॉटेल रुमपर्यंत पोहोचले असं बोर्डाने आपल्या एडवायजरीत स्पष्टपणे म्हटलं आहे. काही प्रकरणात टीम मॅनेजर्सना विजिटर्स येऊन गेल्याचं माहित सुद्धा नव्हतं. BCCI ने तात्काळ कठोर पावलं उचलत असे प्रकार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आता खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी संबंधित कुठलाही व्यक्ती, कितीही जवळची असो, भले त्याचं काहीही नातं असो, पण टीम मॅनेजरच्या लिखित परवानगीशिवाय तो हॉटेल रुममध्ये जाऊ शकत नाही असं नव्या गाइडलाइनमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे.

मॅनेजरची लिखित परवानगी लागेल

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला भेटायला येणार्‍या पाहुण्यांना आता हॉटेलमधील सार्वजनिक ठिकाणी उदहारणार्थ लॉबी, रिसेप्शन लाऊंज या ठिकाणीच भेटायची परवानगी असेल हे बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. कुठल्याही पाहुण्याला खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफच्या हॉटेल रुमममध्ये जाण्यासाठी मॅनेजरची लिखित परवानगी घ्यावी लागेल.

बीसीसीआयने आधीच सर्तक केलय

हनी ट्रॅप आणि सुरक्षेला असलेले अन्य धोके या बद्दल बोर्डाने फ्रेंचायजींना सर्तक केलं आहे. हाय-प्रोफाइल स्पोर्ट्स वातावरणात टार्गेटेड कॉम्प्रोमाइज आणि हनीट्रॅप सारख्या घटनांचा धोका असतो. त्याशिवाय लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपांची शक्यताही नाकारता येत नाही असं एडवायजरीत म्हटलं आहे. बीसीसीआयने सर्व आयपीएल फ्रेंचायजींना खेळाडूंच्या सुरक्षेबाबत सतर्क आणि सक्रीय राहण्यास सांगितलं आहे.

 

Follow Us