IPL 2026 : शेन वॉर्नचा एक छोटा निर्णय आज ठरला मास्टरस्ट्रोक, राजस्थान रॉयल्समुळे त्याच्या कुटुंबाला 460 कोटींची लॉटरी

IPL 2026 : आयपीएल 2026 चा सीजन सुरु होण्याआधी एक व्यवहार झालाय. राजस्थान रॉयल्स टीम संदर्भातली या सगळ्या व्यवहारात शेन वॉर्नचा एक निर्णय मास्टर स्ट्रोक ठरला आहे. तो आज हयात नाहीय. पण त्याच्या कुटुंबाला 460 कोटी रुपये मिळणार आहेत.

IPL 2026 : शेन वॉर्नचा एक छोटा निर्णय आज ठरला मास्टरस्ट्रोक, राजस्थान रॉयल्समुळे त्याच्या कुटुंबाला 460 कोटींची लॉटरी
shane warne
Image Credit source: Getty Images
| Updated on: Mar 25, 2026 | 9:43 AM

Shane Warne आयपीएलमध्ये विक्री झालेला पहिला खेळाडू होता. राजस्थान रॉयल्स टीमचा तो पहिला कॅप्टनही होता. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या मोसमाचं जेतेपद पटकावलं. तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का, IPL 2026 सुरु होण्याआधी राजस्थान रॉयल्स टीमची 15300 कोटी रुपयात एक डील झाली आहे. त्याचा फायदा शेन वॉर्नला सुद्धा झाला आहे. भले, शेन वॉर्न आता या जगात नसेल पण त्याच्या कुटुंबाला याचा फायदा नक्की मिळेल. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास राजस्थान रॉयल्सची टीमची 15300 कोटी रुपयात विक्री झाल्यानंतर शेन वॉर्नला लॉटरी लागली आहे.

तुम्ही विचार करत असाल हे कसं शक्य आहे? राजस्थान रॉयल्स टीम अमेरिका स्थित सोमानीने 1.63 बिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 15,300 कोटी रुपये खर्च करुन विकत घेतली आहे. त्याचा फायदा शेन वॉर्नच्या कुटुंबाला कसा होईल?. त्याचं उत्तर आहे, शेन वॉर्नचा दूरदृष्टीचा विचार. त्याने भविष्याचा विचार करुन एक निर्णय घेतला होता. त्या बद्दल समजल्यानंतर लोक याला शेन वॉर्नचा मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत.

टीममध्ये वॉर्नची एकूण इक्विटी किती?

शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सकडून IPL चे 4 सीजन खेळला. या दरम्यान त्याने प्रत्येक सीजनमध्ये 9.35 कोटी रुपये सॅलरी घेतली. त्याच्याशिवाय त्याने राजस्थान रॉयल्सकडे आणखी काहीतरी मागितलं होतं. ते म्हणजे फ्रेंचायजीत इक्विटी. शेन वॉर्नची दरवर्षी राजस्थान रॉयल्स टीममध्ये 0.75 टक्के इक्विटी होती. वॉर्न आयपीएलचे चार सीजन खेळला. म्हणजे 0.75 टक्के हिशोबाने राजस्थान रॉयल्समध्ये त्याची एकूण इक्विटी झाली 3 टक्के.

हा पैसा कोणाला मिळणार?

आता राजस्थान रॉयल्स टीमची 15300 कोटी रुपयात विक्री झाली आहे. याचा अर्थ 3 टक्क्याच्या हिशोबाने वॉर्नच्या वाट्याला 460 कोटी रुपये आले. आता हा सर्व पैसा त्याच्या कुटुंबाला मिळेल.

शेन वॉर्नची आयपीएलमध्ये कामगिरी कशी आहे?

शेन वॉर्न आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स टीमसाठी चार सीजन खेळला. एकूण 55 सामने खेळताना त्याने 57 विकेट काढलेत. 2008 ते 2011 पर्यंत वॉर्न राजस्थान रॉयल्स टीमचा भाग होता. IPL 2008 त्याचा सर्वात यशस्वी सीजन ठरला. यात त्याने 19 विकेट काढून टीमला चॅम्पियन बनवलं.

Follow Us