AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे सभागृहात उद्धव ठाकरेंबद्दल चांगलं बोलले, त्यावर संजय राऊत म्हणतात…

इराण-इस्रायल युद्धात मध्यस्थता करायला ते तयार आहेत. पण भारत सरकार अशी भूमिका घेत नाही. ट्रम्प पाकिस्तानचं स्वागत करत असतील तर विश्वगुरु कुठे आहेत?

एकनाथ शिंदे सभागृहात उद्धव ठाकरेंबद्दल चांगलं बोलले, त्यावर संजय राऊत म्हणतात...
Uddhav Thackeray-Eknath Shinde
| Updated on: Mar 25, 2026 | 10:51 AM
Share

“निवडणुक काळात खरात भक्तांवर दबाव आणून भाजपचा प्रचार करा, मतदान करा अशी भूमिका अशोक खरात घेता होता. असं नसतं तर बच्चू कडू यांना भाजपाचे मंत्री बनून भेटायला या अशा आशिर्वाद दिला नसता” असं राऊत म्हणाले. अजित पवार विमान अपघात प्रकरणात कर्नाटकात झिरो एफआयआर नोंदवण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “फडणवीस सांगत होते की, अजित पवार माझे जिवाभावाचे मित्र आहेत. मित्र आहेत, मग पवार कुटुंबाचा एक एफआयआर दाखल केला असता, तस काही झालं नाही”.

काल विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे साहेब असा उल्लेख केला. प्रकृती, आरोग्य चांगलं रहावं अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर राऊत बोलले की, “शिष्टाचार आहे. संस्कार आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना असंख्य पदं दिली आहेत. त्यांची जडणघडण केली आहे. ती जर केली नसती, तर 50-50 कोटींची आज जी क्षमता निर्माण झाली, ती झाली नसती. ती कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात असेल. उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदे आज फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बसले आहेत”

विश्वगुरु कुठे आहेत?

“सर्वपक्षीय बैठकीला आम्ही उपस्थित राहणार . सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी आपलं म्हणणं सरकारसमोर मांडलं पाहिजे. युद्धानंतर अशी स्थिती आहे. भारताचं अस्तित्व आहे की नाही या सगळया प्रकरणात हे समजतच नाहीय. पाकिस्तानचं ट्रम्प यांनी अभिनंदन केलय. पाकिस्तानने पुढाकार घेतला.इराण-इस्रायल युद्धात मध्यस्थता करायला ते तयार आहेत. पण भारत सरकार अशी भूमिका घेत नाही. ट्रम्प पाकिस्तानचं स्वागत करत असतील तर विश्वगुरु कुठे आहेत?” असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारलेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?