Ashok Kharat Case | अशोक खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली माहिती
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अशोक खरात प्रकरणावर निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, व्हाट्सअप एप्लिकेशनवर फिर्यादी आणि एका महिलेचे फोटो प्रसारित करून सोशल मीडियावर व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींची खंडणी मागितली गेली होती.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अशोक खरात प्रकरणावर निवेदन सादर केले. त्यांनी सांगितले की, व्हाट्सअप एप्लिकेशनवर फिर्यादी आणि एका महिलेचे फोटो प्रसारित करून सोशल मीडियावर व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींची खंडणी मागितली गेली होती. सदर फोटो दिनेश परब याला राजेंद्र जासूद यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावरून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राथमिक तपास नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने केला आहे. अशोक खरातचा मोबाईल सायबर विभागाकडे तपासासाठी दिला गेला, मात्र त्यातून काही विशेष माहिती मिळालेली नाही. चॅटमध्येही काही पुरावे सापडले नाहीत. राजेंद्र जासूद आणि दिनेश परब यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तसेच, नीरज जाधव याच्या सहभागाबाबत तपास सुरू असून, त्याच्याकडून काही पुरावे मिळाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
Published on: Mar 24, 2026 05:37 PM
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!

