NZ vs IND : 1791 चेंडू टाकल्यानंतर भुवनेश्वर कुमारकडून पहिल्यांदा अशी चूक घडली, त्यामुळे करिअरला लागला डाग
NZ vs IND : भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी20 सीरीज सुरु झाली आहे. चार वर्षानंतर भुवनेश्वर कुमारने टीममध्ये कमबॅक केलय. त्याच्या गोलंदाजीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भुवनेश्वरने मागच्या 88 सामन्यात जी चूक केली नव्हती, ती चूक या सामन्यात घडली.

भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एका मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियात कमबॅक केलय. चार वर्षानंतर तो न्यूझीलंड दौऱ्यावर टी20 सामना खेळतोय. गुरुवारी क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात त्याने टीम इंडियाच्या गोलंदाजीचं नेतृत्व केलं. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी केली. फक्त चार धावा त्या षटकात निघाल्या. भुवी तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा बॉलिंगला आला. तेव्हा त्याने टिम सीफर्टला त्याने नो-बॉल टाकला. बॅक ऑफ लेंथ चेंडूवर सीफर्टने मिडविकेटला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण अंपायरने तो चेंडू नो-बॉल ठरवला. त्याचसोबत भुवनेश्वर कुमारच्या टी20 इंटरनॅशनल करिअरला ही एक डाग लागला. भुवीने पहिल्यांदा टी20 मध्ये नो-बॉल टाकला. याआधी खेळलेल्या 88 सामन्यात त्याने कधी अशी चूक केली नव्हती. भुवनेश्वरने तब्बल 1791 चेंडूनंतर पहिला नो-बॉल टाकला.
भुवनेश्वर कुमार 36 वर्षांचा आहे. अलीकडेच वेस्ट इंडिज विरुद्ध पाचव्या टी20 सामन्यात त्याने पुनरागमन केलं होतं. पण पावसामुळे त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्याने याआधी 22 नोव्हेंबर 2022 रोजी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये शेवटची गोलंदाजी केली होती. त्यावेळी सुद्धा समोर न्यूझीलंडचीच टीम होती. भुवनेश्वर कुमार टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी नो-बॉल टाकणारा गोलंदाज आहे. या लिस्टमध्ये तो दुसऱ्या नंबरवर आहे. यापूर्वी 299.3 ओव्हर मध्ये त्याने एकही नो-बॉल टाकला नव्हता. त्याच्यापुढे इंग्लंडचा स्पिनर राशिद आहे. भुवीने या लिस्टमध्ये पाकिस्तानच्या शादाब खानला मागे टाकलं. त्याने 299.1 ओव्हरमध्ये एकही नो-बॉल टाकला नव्हता. त्याच्यानंतर आयर्लंडचा जॉर्ज डॉकरेल (250.2 ओवर) आणि पाकिस्तानचा माजी स्पिनर अजमल (238.2 ओवर) आहे.
भुवनेश्वर कुमारने चार ओव्हरमध्ये किती धावा दिल्या?
भुवीचा नो बॉल न टाकण्याचा सिलसिला भले तुटला असेल. पण त्याने एक मोठं यश सुद्धा मिळवलय. टी20 फुल मेंबर टीम्समध्ये पावरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा तो गोलंदाज बनला आहे. त्याने 680 निर्धाव चेंडू टाकून टिम साउदीचा रेकॉर्ड मोडला. न्यूझीलंडचा माजी दिग्गज गोलंदाजी साउदीने पावरप्लेच्या षटकात 679 डॉट चेंडू टाकले होते. भुवीने क्राइस्टचर्चमध्ये दोन ओव्हर टाकल्या. यात चार डॉट बॉल होते. भुवीने त्याच्या चार ओव्हरच्या स्पेलमध्ये 49 धावा दिल्या. एकही विकेट मिळाला नाही. भुवीने या सामन्यात दोन नो-बॉल टाकले. न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये चार बाद 225 धावा केल्या आहेत.