इंग्लंडमध्ये वर्ल्डकपची धामधूम, ब्रायन लारा सहकुटुंब चंद्रपुरात

| Updated on: Jun 12, 2019 | 4:35 PM

जागतिक क्रिकेट जगतात वाघ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा सध्या सहकुटुंब चंद्रपुरात आहे.

इंग्लंडमध्ये वर्ल्डकपची धामधूम, ब्रायन लारा सहकुटुंब चंद्रपुरात
Follow us on

चंद्रपुर : जागतिक क्रिकेट जगतात वाघ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा सध्या सहकुटुंब चंद्रपुरात आहे. एकीकडे इंग्लंडमध्ये वर्ल्डकपची धामधूम सुरु असताना क्रिकेट जगतातील दिग्गज फलंदाज चंद्रपुरात कसा हा प्रश्न अनेकांना पडला आहे. लारा चंद्रपुरातील ताडोब अभयारण्यात आला आहे. लाराला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची भुरळ लागली आहे.

वाघ पाहण्यासाठी लारा कालपासून ताडोबात ठाण मांडून बसला आहे. तो काल (मंगळवारी) इथे आला असून, एका खासगी रिसॉर्टमध्ये त्याचा मुक्काम आहे. गुरुवारी तो मोहुर्ली येथून सकाळी जंगल सफारीचा आनंद लुटणार आहे. हा दौरा कौटुंबिक असल्याचे बोलले जात आहे.

वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान लारा समालोचक अर्थात कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिसतो. मात्र टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची फोटोग्राफी पाहून, लारा ताडोबाच्या प्रेमात होता. त्यामुळेच वेळात वेळ काढून लारा ताडोबा अभयारण्यात आला आहे.

कोण आहे ब्रायन लारा?

  • ब्रायन लारा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील मोठं नाव आहे.
  • ब्रायन लारा वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.
  • त्याने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे.
  • लाराने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.