Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहच्या जागी या गोलंदाजाला संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्यावेळी पहिल्या सामन्यात टीम इंडिया हारली, त्यानंतर टीम इंडियामध्ये भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा समावेश करण्यात आला.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहच्या जागी या गोलंदाजाला संधी
jasprit-bumrah
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 30, 2022 | 11:06 AM

आशिया चषकात (Asia Cup 2022) गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यानंतर अनेकांनी शंका व्यक्त केली होती. कारण आशिया चषकात फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर सुद्धा समोरची टीम (Cricket Team) जिंकत होती. त्यामुळे सिलेक्शन टीमसह (Selection Team) गोलंदाजांवरती जोरदार टीका झाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुद्धा ही परिस्थिती पाहायला मिळाली, परंतु योग्यवेळी चांगली फलंदाजी झाल्याने टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्यावेळी पहिल्या सामन्यात टीम इंडिया हारली, त्यानंतर टीम इंडियामध्ये भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे उर्वरित दोन सामन्यात देखील त्याला यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीवरती सुद्धा प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

दुखापतीतून सावरलेल्या जसप्रीत बुमराला पुन्हा दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला सध्या सुरु असलेला दौरा अर्धवट सोडावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली मॅच झाली. त्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला.

जसप्रीत बुमराह आजारी असल्यामुळे त्याच्या जागेवरती मोहम्मद सिराज याला संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये सिराजने चांगली गोलंदाजी केली होती.

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद. सिराज.